ICC T20 World Cup 2026 : भारतात टी-२० वर्ल्डकप खेळणार नाही! बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय

    22-Jan-2026   
Total Views |

Bangladesh

मुंबई : (Bangladesh Boycott ICC T20 World Cup 2026)
आयसीसी टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतात होणाऱ्या सामन्यांमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय बांगलादेश क्रिकेट बोर्डाने घेतला आहे. बोर्डाचे अध्यक्ष अमिनुल इस्लाम बुलबुल यांनी याबाबतची माहिती दिली.बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे क्रीडा सल्लागार आसिफ नजरूल यांच्यासोबत आज झालेल्या बैठकीनंतर त्यांनी हा निर्णय जाहीर केला.(Bangladesh Boycott ICC T20 World Cup 2026)

टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील बांग्लादेशचे सामने भारताबाहेर खेळवण्यात यावेत, अशी मागणी बांगलादेश क्रिकेटबोर्डाने आयसीसीकडे केली होती. भारत आणि बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव भारताऐवजी श्रीलंकेत सामने घेण्याची विनंती केली होती.मात्र आयसीसीने ही मागणी फेटाळल्यानंतर भारतात सामने न खेळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तरीही आयसीसीसोबत चर्चा सुरूच राहणार असल्याचे बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले आहे.(Bangladesh Boycott ICC T20 World Cup 2026)"

आयसीसीने त्यांच्या वक्तव्यात स्पष्टपणे सांगितले आहे की, पुरुषांच्या टी-२० क्रिकेट विश्वचषक २०२६ या स्पर्धेचे ठरलेल्या वेळापत्रकानुसारच आयोजन केले जाईल. त्यामुळे बांगलादेशचे सामने भारतातच खेळले जातील. ही स्पर्धा ७ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, पहिलाच सामना बांग्लादेश विरुद्ध वेस्ट इंडिज असा कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर होणार होता. भारत आणि श्रीलंका हे या स्पर्धेचे सहयजमान आहेत.(Bangladesh Boycott ICC T20 World Cup 2026)




अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\