मुंबई : (Ashokrao Modak) "प्राध्यापकांचे आदर्श व्यक्तिमत्व कसे असावे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अशोकराव मोडक. ते एकप्रकारे गुणसागर होते. संघाचा विषय असेल, हिंदुत्वाचा विषय असेल या सर्वांचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. अशोकराव म्हणजे विनम्रतेचे प्रतिमूर्ती होते", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांनी केले. (Ashokrao Modak)
थोर तत्त्वचिंतक आणि संघटक, अभाविपचे पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष व माजी आमदार श्रद्धेय स्व. डॉ. अशोकराव मोडक यांची श्रद्धांजली सभा बुधवार, दि. २१ जानेवारी रोजी प्राचार्य बी. एन. वैद्य सभागृह, दादर पूर्व येथे पार पडली. (Ashokrao Modak) अशोकरावांच्या स्मृतीचे स्मरण करत दत्तात्रय होसबाळे पुढे म्हणाले की, बंगळूरचा मी एक नगर स्तरावरचा कार्यकर्ता होतो. १९७४ च्या अभाविपाच्या दादर मधील एका अधिवेशनात पंधरा दिवस आधी जोडून घ्यायचे आहे, असा मला निरोप आला. तेव्हा अधिवेशनातील शोभायात्रेच्या विभागाची जबाबदारी अशोकरावांकडे होती. तेव्हा अशोकराव यांच्याशी माझा संबंध आला आणि मुंबईशी माझे जिव्हाळ्याचे नाते तेव्हापासून जोडले गेले." (Ashokrao Modak)
पुढे ते म्हणाले, "हल्ली गुगलच्या जमान्यात बऱ्याच गोष्टी सहज उपलब्ध होतात. पूर्वी या गोष्टी नव्हत्या. त्याही काळात अशोकराव मूळ अध्ययन करणारे परिश्रमी संशोधक होते. 'मन समर्पित, तन समर्पित और यह जीवन समर्पित' संघाच्या या गीतातील एकूण एक शब्द त्यांच्या आयुष्याशी जुळतो. त्यांच्या जीवनातील एक तरी आदर्श बिंदू आपण आपल्या आचरणात आणू हीच त्यांच्यासाठी खरी आदरांजली ठरेल." (Ashokrao Modak)
हेही वाचा : Dr. Mohanji Bhagwat : ‘नवे क्षितिज’ व्याख्यानमालेचा मुंबईत समारोप
याप्रसंगी अशोकराव मोडक यांच्या परिवारातून त्यांच्या पत्नी डॉ. अंजली अशोक मोडक, मुलगा आशिष मोडक, सून स्मिता आशिष मोडक, कन्या अर्चना भिडे, नातवंड अदिती, अवनी, अर्णव आणि अशोकरावांचे बंधू अरुण मोडक उपस्थित होते. (Ashokrao Modak)
श्रद्धांजली सभेदरम्यान राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, रा.स्व.संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर, विवेकानंद केंद्राचे महाराष्ट्र-गोवा राज्य प्रमुख अभय बापट, कोकण पदवीधर मंचाचे वसंतराव काणे, राष्ट्रीय सामाजिक विज्ञान परिषदेच्या सचिव वैदेही दप्तरदार, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, भारतीय स्त्री शक्तीच्या नयना सहस्रबुद्धे, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे अभिराम पाटील, अभाविपचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य मिलिंद मराठे, संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक संजीव परब, भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय संघटन मंत्री बी. सुरेंद्रनजी, मुलगा आशिष मोडक यांनी अशोकरावांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. अशोकराव मोडक यांना पाठवलेल्या पत्राचे वाचनही यावेळी करण्यात आले. (Ashokrao Modak)