Adv. Ashish Shelar: आरक्षण सोडत हा प्रक्रियेचाच भाग, मुंबईत महायुतीचाच महापौर होणार: ॲड. आशिष शेलार

22 Jan 2026 15:10:20
 Adv. Ashish Shelar
 
मुंबई : (Adv. Ashish Shelar) मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या आरक्षण सोडतीनंतर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत असतानाच, भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी ठाम भूमिका मांडली आहे. आरक्षणाची सोडत ही केवळ घटनात्मक आणि कायदेशीर प्रक्रियेचा भाग असून, मुंबईत महायुतीचाच महापौर बसेल, असा विश्वास शेलार यांनी व्यक्त केला आहे. (Adv. Ashish Shelar)
 
हेही वाचा :  Mayor Reservation LIVE Update: राज्यातील महापौरपदांची आरक्षण यादी जाहीर, १७ प्रमुख शहरांत 'खुला प्रवर्ग'! तर या महापालिकांमध्ये येणार 'महिलाराज'
 
माध्यमांशी बोलताना आशिष शेलार म्हणाले की, “आरक्षणाची सोडत हा प्रक्रियेचा एक महत्त्वाचा टप्पा असतो. कायद्यानुसार, परंपरेनुसार आणि नियमांनुसार ही सोडत पार पडली आहे. मुंबईकरांनी महायुतीला स्पष्ट कौल दिला आहे. मुंबईकरांच्या आशीर्वादाने महायुतीचाच महापौर मुंबई महानगरपालिकेत बसेल. हा महापौर केवळ सत्तेसाठी नाही, तर मराठी माणसाच्या सेवेसाठी आणि संपूर्ण मुंबईच्या विकासासाठी काम करणारा असेल.” (Adv. Ashish Shelar)
 
 
Powered By Sangraha 9.0