Ashish Shelar : मुंबई महापालिकेत वाजतगाजत महायुतीचा महापौर बसेल - मंत्री ॲड. आशिष शेलार

22 Jan 2026 19:09:50
 
Ashish Shelar
 
राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले की, "आरक्षणाची सोडत हा प्रक्रियेचा भाग असतो. या प्रक्रियेत जी काही सोडत झाली ती नियमानुसार झाली असून आता नियमानुसार मुंबईत महायुतीचा महापौर बसेल."(Ashish Shelar)
 
हेही वाचा : Kirit Somaiya : किरीट सोमय्या यांची एमआयएम पक्षाविरोधात तक्रार; कारवाईची मागणी 
 
संजय राऊतांच्या बौद्धिक पातळीचा लोचा
 
"महायुतीत कुठलाही बेबनाव किंवा अंतर्गत संघर्ष नाही. मी एवढेच म्हणेन की, बडे बडे शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है. आमची कुठलीही अडचण नाही. महायुतीमध्ये अडचणीचा प्रश्नच येत नाही. संजय राऊत यांच्या राजकीय बौद्धिक पातळीत लोचा आहे, तो त्यांनी बघावा," अशी टीकाही त्यांनी केली. (Ashish Shelar)

तसेच मुंबईच्या विकासासाठी सर्वांच्या सुचनांचे स्वागत
 
"मुंबईच्या सेवेसाठी सगळ्यांच्या सूचना आणि अनुभव आम्हाला महत्वाचा वाटतो. पुढची पाच वर्षे आम्ही महायुती म्हणून सेवा करणार आहोत. त्यात बाळा नांदगावकर, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, काँग्रेस या सर्वांच्या सूचनांचेही आम्ही स्वागत करू," असेही मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले.
 
 
Powered By Sangraha 9.0