Mahant Ramgiri Maharaj : धर्माला ग्लानी येते तेव्हा सत्तेचा वापर करून मात केली पाहिजे

21 Jan 2026 16:33:24
Mahant Ramgiri Maharaj
 
मुंबई : (Mahant Ramgiri Maharaj) धर्म आपले रक्षण करतो तसंच आपलंही कर्तव्य आहे की, आपण धर्माचं रक्षण केलं पाहिजे. धर्माला जेव्हा ग्लानी येत असेल तेव्हा सत्तेचा वापर करून त्यावर मात केली पाहिजे. रामाचा आदर्श आपण घेतला पाहिजे, असे मत सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी व्यक्त केले. ते छत्रपती संभाजीनगर येथे भारतीय जनता पार्टीच्या मध्यवर्ती कार्यालयात नवनिर्वाचित नगरसेवकांच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी निवडून आलेल्या नगरसेवकांना राजधर्माचे पालन करण्यास सांगितले.(Mahant Ramgiri Maharaj)
 
ते (Mahant Ramgiri Maharaj) म्हणाले की, दृष्ट कृत्य करणारा मुघल औरंगजेब स्वतःच्या बापाचा होऊ शकला नाही, तो दुसरा कोणाचा कसा होईल? अशा प्रवृत्तीच्या लोकांकडं सात्विकपणा कसा येईल, अशा उन्मत्त लोकांवर अंकुश ठेवला पाहिजे.(Mahant Ramgiri Maharaj)
 
अविवेकी माणसाच्या हातात सत्ता आली तर तो त्याचा दुरुपयोग करतो. ज्यांच्याकडे विवेकीपणा आहे त्यांच्याकडे आता छत्रपती संभाजीनगरची सत्ता आली आहे. अशा कठोर शब्दांत रामगिरी महाराजांनी एमआयएमवर निशाणा साधला.(Mahant Ramgiri Maharaj)
 
हेही वाचा : Chhattisgarh : छत्तीसगडच्या ४७ कुटुंबांची ‘घरवापसी’ 
 
ते (Mahant Ramgiri Maharaj) पुढे म्हणाले की, हिंदू धर्म सहिष्णू आहे मात्र नपुंसक नाही. कोणी अन्याय करत असेल तर तो सहन करू नये हे आपले शास्त्र सांगते. आपले शास्त्र एका गालात मारली तर दुसऱ्या गालात मारून घ्या असे सांगत नाही. एका गालावर मारल्यावर दुसरा गाल पुढे करून मारा असं म्हणण्यासारखे दुसरे नपुंसकत्वक नाही.(Mahant Ramgiri Maharaj)
 
एमआयएमचे अतिउन्मत्त लोक आहेत. त्यांना वठणीवर आणण्याचे काम करावे लागेल. आज छत्रपती संभाजीनगर शहरातील काही भागात आपल्याला जाताही येतही नाही. हि परिस्थिती बदलावी लागेल. आमच्या ईश्वराशिवाय इतर कोणीही पुजनीय नाही असे म्हणणाऱ्यांच्या विरोधात उभे राहावे लागेल.(Mahant Ramgiri Maharaj)
 
 
Powered By Sangraha 9.0