दावोस : (Davos World Economic Forum) दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या (Davos World Economic Forum) वार्षिक परिषदेत उभारण्यात आलेले ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ पॅव्हेलियन हे यंदा उद्योगजगत आणि गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. जागतिक पातळीवरील आघाडीचे उद्योजक, बहुराष्ट्रीय कंपन्यांचे प्रतिनिधी, धोरणकर्ते आणि भारतातील मान्यवरांनी या पॅव्हेलियनला आवर्जून भेट देत महाराष्ट्रातील गुंतवणूक संधी, धोरणे आणि विकासदृष्टी जाणून घेतली.(Davos World Economic Forum)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या प्रतिनिधी मंडळाने पॅव्हेलियनला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे स्वागत केले.(Davos World Economic Forum) औद्योगिक विकास, पायाभूत सुविधा, हरित ऊर्जा, शहरी नियोजन, तंत्रज्ञान आणि स्टार्टअप इकोसिस्टम या विषयांवर येथे सविस्तर संवाद साधण्यात आला. महाराष्ट्राची उद्योगपूरक धोरणे आणि जलद निर्णयक्षम प्रशासन यामुळे गुंतवणूकदारांमध्ये विशेष उत्साह दिसून आला.(Davos World Economic Forum)
दावोस (Davos World Economic Forum) दौऱ्यावर आलेले भारताचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीही इंडिया पॅव्हेलियनमध्ये भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. रेल्वे, शहरी परिवहन आणि पायाभूत विकासाच्या संदर्भात यावेळी अनौपचारिक चर्चा झाली.(Davos World Economic Forum)
हेही वाचा : तिसऱ्या मुंबईतील रायगड-पेण येथे ग्रोथ सेंटर
महाराष्ट्र पॅव्हेलियनच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांच्याशी स्वतंत्र चर्चा केली. महाराष्ट्रात हरित औद्योगिक पट्टा (ग्रीन इंडस्ट्रियल कॉरिडॉर) विकसित करण्याच्या दृष्टीने सहकार्याबाबत या बैठकीत सकारात्मक संवाद झाला. यामुळे राज्यात विदेशी गुंतवणूक वाढण्याबरोबरच एमएसएमई क्षेत्राची स्पर्धात्मक क्षमता आणि निर्यातक्षमता वाढण्यास मदत होणार आहे.(Davos World Economic Forum)
तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी बर्मुडाचे पंतप्रधान डेव्हिड बर्ट यांच्याशी भेट घेऊन सर्वसमावेशक विकास, नाविन्यपूर्ण धोरणे आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य यावर चर्चा केली.(Davos World Economic Forum) या संवादातून महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय गुंतवणूक आणि सहकार्यासाठी विश्वासार्ह व स्वागतशील गंतव्य म्हणून पुढे येत असल्याचे अधोरेखित झाले.(Davos World Economic Forum)
ह्युंदाई, जेबीआयसी, एपी मोलर–मर्सेक, फिनलंड, इस्रायल, हॅवलेट पॅकर्ड, अँटोरा एनर्जी यांसारख्या आघाडीच्या जागतिक संस्थांच्या प्रतिनिधींनीही महाराष्ट्र पॅव्हेलियनला भेट देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी विविध क्षेत्रातील सहकार्यांबाबत चर्चा केली. ईव्ही, हरित गुंतवणूक, अर्बन मोबिलिटी, लॉजिस्टिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ऊर्जा साठवणूक आणि सर्क्युलर इकॉनॉमी यांसारख्या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्रात मोठ्या संधी असल्याचे यावेळी स्पष्ट झाले. एकूणच, दावोस येथील मॅग्नेटिक महाराष्ट्र पॅव्हेलियनने (Davos World Economic Forum) जागतिक व्यासपीठावर राज्याची विकासदृष्टी, गुंतवणूक क्षमता आणि धोरणात्मक ताकद प्रभावीपणे मांडत उद्योग व गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले आहे.(Davos World Economic Forum)