Vijayraj Bodhankar : ‘ध्वनी’चित्रांमधून उलगडला अमूर्त शब्दसंचिताचा प्रवास

21 Jan 2026 16:52:03
Vijayraj Bodhankar
 
मुंबई : (Vijayraj Bodhankar) प्रख्यात चित्रकार, लेखक तथा कवी विजयराज बोधनकर (Vijayraj Bodhankar) यांच्या अनोख्या चित्रांचे प्रदर्शन सध्या कोलाबा येथील किस्मत आर्ट गॅलरी येथे सुरु आहे. दि. २० जानेवारी ते २७ जानेवारी या कालावधीमध्ये सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळापर्यंत प्रेक्षकांना हे प्रदर्शन अनुभवता येणार आहे. कलेच्या क्षेत्रात मुशाफिरी करणाऱ्या विजयराज बोधनकर (Vijayraj Bodhankar) यांनी आजपर्यंत असंख्य वेगवेगळ्या कलाकृतींमधून आपल्या कार्याची चुणूक दाखवून दिली आहे. त्यांच्या शैलीतील याच वेगळेपणाचे स्वागत नव्या प्रदर्शनातून होत आहे.(Vijayraj Bodhankar)
 
विजयराज बोधनकर (Vijayraj Bodhankar) यांच्या या एकल चित्रप्रदर्शनाचा केंद्र बिंदू आहे ‘ ध्वनि’. माणूस जन्माला आल्यापासून त्याच्या कानांवर वेगवेगळ्या प्रकारचे ध्वनि पडत असतात. या ध्वनिचं अमूर्त रुप कसं असेल हा विचार चित्रकाराने या चित्रांमध्ये मांडल्याचे आपल्याला बघायाला मिळते. अक्षरं हा आपल्या जीवनाचा आणखी एक महत्वाचा भाग. य़ा अक्षरांचा ध्वनि सुद्धा आपलं जीवन, समाजमन व्यापून टाकतो. अक्षरविश्वाचा हाच अवकाश चित्रकाराने या चित्रांमध्ये व्यक्त केला आहे. अमूर्त चित्र म्हणजे केवळ रंगसंगतीचा खेळ नव्हे, तर तो अर्थाचा आणि अवकाशाचा देखील एक खोल डोह आहे, याची प्रचिती आपल्याला त्यांची चित्रं बघताना येतात. वरवर गूढ वाटणाऱ्या या चित्रांमध्ये आपण एकदा रमलो कि त्यातील आनंद आपोआप उलगडतो. उलगडण्याची हीच अनुभूती महत्वाची आहे असे मत चित्रकार विजयराज बोधनकर यांनी व्यक्त केले.(Vijayraj Bodhankar)
 
हेही वाचा : P.L. Deshpande Maharashtra Kala Academy : पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये विशेष व्याख्यानमालेचे आयोजन  
 
प्रकाश आणि सावली यांच्या अंतरंगातून ज्यावेळी कॅनव्हसवर चित्र साकारलं जातं, त्यावेळी यातून एक वेगळा विचार आपल्यासमोर मांडला जातोय हे आपल्याला दिसून येतं. या चित्रांमध्ये अक्षरांचंविश्व असलेलं अस्तित्व शाश्वत आहे. आणि हा शाश्वत विचार आपल्याला शोधावा लागतो. तो सहजासहजी सापडत नाही. या चित्रांबरोबरच कोविडच्या काळात त्यांनी साकारलेले चित्रं सुद्धा प्रेक्षकांसाठी इथे उपलब्ध आहेत. शाळेमध्ये चित्रप्रदर्शन भरवून, केवळ विद्यार्थीच नव्हे तर सामान्य माणसांना सुद्धा लिहीतं करणाऱ्या या चित्रकाराचा पिंड वेगळा आहे. हे वेगळं चित्रप्रदर्शन अनुभवण्यासाठी या गॅलरीला भेट द्यायलाच हवी.(Vijayraj Bodhankar)
 
 
 
Powered By Sangraha 9.0