मुंबई : (Chhattisgarh) छत्तीसगडच्या (Chhattisgarh) सुकमा जिल्ह्यात ख्रिश्चन धर्माचा त्याग करून ४७ कुटुंबांनी ‘घरवापसी’ केली आहे. ही घरवापसी दोरला समाजाच्या एका भव्य कार्यक्रमात पार पडली. सर्व कुटुंबांचे पुष्पहार घालून पुन्हा सनातन धर्मात स्वागत करण्यात आले.(Chhattisgarh)
जिल्ह्यातील कोंटा विकासखंडातील जान गोलापल्ली येथे दोरला समाजाचे पटेल-पुजारी परिचर्चा संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात ९ पंचायतांतील ४० गावांमधील सुमारे ३ हजार कुटुंबांनी सहभाग घेतला. याच संमेलनात ४७ कुटुंबांची घरवापसी घडवून आणण्यात आली. समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी ही घटना सामाजिक एकता आणि सांस्कृतिक पुनर्जागरणाच्या दिशेने एक महत्त्वाची पायरी असल्याचे सांगितले.(Chhattisgarh)
हेही वाचा : Kerala Suicide Case : केरळ बसमधील छेडछाड आरोप प्रकरणात दीपक यांच्या आत्महत्येनंतर सोशल मीडिया इन्फ्लुएंसर महिलेविरोधात गुन्हा दाखल
संमेलनाला संबोधित करताना समाजाचे प्रवक्ते आणि ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली की दोरला समाज हळूहळू इतर समाजांच्या संस्कृतीवर अवलंबून होत चालला आहे. (Chhattisgarh) यामुळे समाजाच्या मूळ परंपरा, रितीरिवाज आणि सांस्कृतिक ओळख नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे समाजबांधवांनी आपल्या संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याचे आवाहन त्यांनी केले.(Chhattisgarh)