Belasis Flyover : १३० वर्षांचा ब्रिटिशकालीन पूल अवघ्या १५ महिन्यांत नव्या रूपात

20 Jan 2026 19:52:33
Belasis Flyover
 
मुंबई : (Belasis Flyover) मुंबईच्या मध्यवर्ती भागातील ताडदेव–नागपाडा आणि मुंबई सेंट्रल स्थानकाला जोडणारा बेलासिस उड्डाणपूल (Belasis Flyover) अवघ्या १५ महिने ६ दिवसांत पूर्ण झाला आहे. विशेष म्हणजे, निविदेतील मुदतीपेक्षा तब्बल ४ महिने आधीच हा महत्त्वाचा प्रकल्प साकार झाला आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये कार्यादेश देण्यात आलेल्या या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम १ ऑक्टोबर २०२४ रोजी सुरू झाले. अत्यंत नियोजनबद्ध कार्यपद्धती, अहोरात्र परिश्रम आणि विविध यंत्रणांमधील उत्कृष्ट समन्वयामुळे हा पूल विक्रमी वेळेत पूर्ण होऊ शकला, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.(Belasis Flyover)
 
महानगरपालिकेचा वेगवान विकासाचा नमुना
 
रेल्वे रूळांवरील कामे रेल्वे विभागाने, तर गर्डर ब्रेसींग, डेक शीट, स्लॅब कास्टिंग आणि दोन्ही बाजूंचे पोहोच मार्ग बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पूल विभागाने यशस्वीरीत्या पूर्ण केले.(Belasis Flyover) पूल विभाग, रेल्वे प्रशासन, स्थानिक वॉर्ड कार्यालय आणि वाहतूक पोलिस यांच्यातील समन्वय हे या यशाचे मुख्य सूत्र ठरले.(Belasis Flyover)
 
हेही वाचा : भारताची फुलराणी सायना नेहवालची निवृत्ती; भारतीय क्रीडाक्षेत्रातील सुवर्ण अध्याय संपला 
 
१३० वर्षांचा ब्रिटिशकालीन पूल – नव्या रूपात
 
धोकादायक ठरलेल्या १३० वर्षे जुन्या ब्रिटिशकालीन बेलासिस पुलाचे (Belasis Flyover) पाडकाम करून त्याच ठिकाणी अत्याधुनिक, सुरक्षित आणि भविष्यासाठी सक्षम असा नवा उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.(Belasis Flyover)
 
“काटेकोर नियोजन आणि शिस्तबद्ध अंमलबजावणीमुळे सर्व आव्हानांवर मात करत बेलासिस उड्डाणपूल (Belasis Flyover) मुदतीपूर्वी पूर्ण झाला आहे. नागरिकांना कमीत कमी त्रास होईल, अशा दर्जेदार पायाभूत सुविधा वेळेत पूर्ण करण्यासाठी महानगरपालिकेचे सर्व विभाग सातत्याने प्रयत्नशील राहतील. आवश्यक सर्व प्रमाणपत्रे मिळाल्यानंतर वाहतूक पोलिसांच्या समन्वयाने पूल लवकरच वाहतुकीस खुला करण्यात येईल.”(Belasis Flyover) 
- अभिजीत बांगर,
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प)
 
पुलाची वैशिष्ट्ये
 
एकूण लांबी : ३३३ मीटर
 
पूर्व बाजू : १३८.३९ मीटर
 
पश्चिम बाजू : १५७.३९ मीटर
 
रेल्वे हद्दीतील भाग : ३६.९० मीटर
 
७ मीटर रुंद वाहतूक मार्ग
 
दोन्ही बाजूंना सुरक्षित व प्रशस्त पदपथ
 
 
Powered By Sangraha 9.0