Maharashtra Pollution Control Board : प्रदुषण नियंत्रणासाठी एमसीबीचा जपानच्या ओसाका शहराशी सामंजस्य करार

20 Jan 2026 16:43:43
Maharashtra Pollution Control Board
 
मुंबई : (Maharashtra Pollution Control Board) पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण नियंत्रणासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (Maharashtra Pollution Control Board) आणि जपानच्या ओसाका शहरादरम्यान ऐतिहासिक सामंजस्य करार करण्यात आला आहे. याद्वारे घनकचरा व्यवस्थापन, जलप्रदूषण, वायू प्रदूषण आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येईल.(Maharashtra Pollution Control Board)
 
प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण नियंत्रणाला चालना देण्यासाठी जपानच्या ओसाका शहर आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) (Maharashtra Pollution Control Board) यांच्यात नुकताच एक सामंजस्य करार करण्यात आला आहे. या सामंजस्य करारावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (Maharashtra Pollution Control Board) अध्यक्ष सिद्धेश कदम, सदस्य सचिव एम. देवेंद्र सिंग, आय.ए.एस. आणि मुंबईतील जपानचे महावाणिज्यदूत कोजी यागी-सान यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दरम्यान, ओसाका शहराच्या शिष्टमंडळात ओसाका शहर सरकारच्या पर्यावरण विभागाचे प्रतिनिधी, ग्लोबल एन्व्हायर्नमेंट सेंटर, जपानचे वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी शुनसुके कावाबे, अकिको डोई, तोमोया मोटोडा, नाकाजिमा नाओ, चिका काटाओका, सुनिची होंडा, यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.(Maharashtra Pollution Control Board)
 
हेही वाचा : Davos World Economic Forum : दावोस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्राचाच डंका !
 
राज्यातील घनकचरा, जलप्रदूषण, वायू प्रदूषण आणि कार्बन उत्सर्जनाशी संबंधित समस्यांवर प्रभावीपणे तोडगा काढण्यासाठी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (Maharashtra Pollution Control Board) ओसाका शहर प्रशासनासोबत हा सामंजस्य करार केला. याद्वारे राज्यातील पर्यावरणीय समस्यांचे निराकरण करण्यासाठी एक संरचित, कालबद्ध आराखडा विकसित केला जाईल. यामध्ये ओसाका शहर प्रशासनामार्फत जपान सरकारच्या सहकार्याने तंत्रज्ञान हस्तांतरण, सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण, कौशल्य विकास, प्रशिक्षण कार्यक्रम आणि अभ्यास गटांचा समावेश असेल. या सामंजस्य करारांतर्गत, ओसाका शहर महाराष्ट्रात घनकचरा व्यवस्थापन, जल आणि वायू प्रदूषण नियंत्रण, कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि एकल-वापर प्लास्टिकच्या पुनर्वापरासाठी सर्वसमावेशक सहकार्य करेल. यामुळे राज्यात हरित आणि शाश्वत पर्यावरण निर्माण करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण योगदान मिळेल, असा विश्वास सिद्धेश कदम यांनी व्यक्त केला.(Maharashtra Pollution Control Board)
 
ओसाका शहर प्रभावी प्रदूषण नियंत्रणाचे आदर्श उदाहरण
 
१९६० च्या दशकात, जपानमध्ये वेगाने औद्योगिकीकरण होत असताना गंभीर पर्यावरणीय प्रदूषणाचे प्रश्न समोर येऊ लागले. त्यावेळी, जपान सरकारने कठोर कायदे लागू करून आणि त्यांची काटेकोर अंमलबजावणी करून या आव्हानांना तोंड दिले. ओसाका शहराला प्रभावी प्रदूषण नियंत्रणाचे एक आदर्श उदाहरण मानले जाते. विकासामुळे सभोवतालच्या पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम होणार नाही याची खात्री करून, ओसाका शहर प्रशासनाने स्थानिक पातळीवर जलप्रदूषण, वायू प्रदूषण, घनकचरा, कार्बन उत्सर्जन आणि हरितगृह वायूंचे यशस्वीपणे व्यवस्थापन केले आहे. मजबूत कायदे आणि सक्रिय जनसहभागाच्या संयोजनातून, ओसाका शहराने शून्य कार्बन उत्सर्जनाच्या दिशेने काम करण्यात आणि इतर पर्यावरणीय आव्हानांना सामोरे जाण्यात उल्लेखनीय यश मिळवले आहे.(Maharashtra Pollution Control Board)
 
 
Powered By Sangraha 9.0