मुंबई : (Keshav Upadhye) उबाठा-मनसे युतीत सर्वाधिक नुकसान कोणाचे झाले, हे आता आकडेवारीतून स्पष्टपणे समोर येत आहे. या युतीचा फायदा उबाठाला झाला, तर मनसेला मोठा फटका बसला, हे वास्तव नाकारता येत नाही, अशी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी केली.(Keshav Upadhye)
आपल्या 'एक्स' अकाऊंटवरील पोस्टमध्ये केशव उपाध्ये (Keshav Upadhye) म्हणाले की, "मनसेच्या मतांचा फायदा उबाठाला झाला आणि त्यामुळे उबाठाची मतसंख्या वाढली. मात्र, उबाठाची मते मनसेकडे वळली नाहीत, हे निवडणूक निकालांनी अधोरेखित केले आहे. अवघ्या दीड वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबईत मनसेला ७.१३ टक्के मते मिळाली होती. मात्र, महापालिका निवडणुकीत हीच मतटक्केवारी घसरून थेट २.९१ टक्क्यांवर आली आहे."(Keshav Upadhye)
हेही वाचा : Imtiaz Jaleel: एमआयएमला शिंदे गटाचा प्रस्ताव?; इम्तियाज जलील यांचा मोठा दावा
असंगाशी संग केल्याचा मनसेला फटका
"दुसरीकडे, विधानसभा निवडणुकीत उबाठाला मुंबईत २३.२२ टक्के मते मिळाली होती. तीच मते महापालिका निवडणुकीत वाढून २७.४७ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहेत. या आकडेवारीवरून असंगाशी संग केल्याचा फटका मनसेला किती महागात पडला, हे स्पष्टपणे दिसून येते," असेही केशव उपाध्ये म्हणाले.(Keshav Upadhye)