डोंबिवली: (Municipal elections) डोंबिवलीतील भाजपची विजयी घोडदौड आज दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. डोंबिवली पूर्व येथील पॅनल क्रमांक 26 अ येथील मुकुंद पेडणेकर आणि 27 ड मधील भाजपाचे उमेदवार महेश पाटीलही बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे आता भाजपाचे ७ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने पेडणेकर आणि पाटील यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली आहे. पाटील यांच्या समोर मनसेचे उमेदवार मनोज घरत होते. मनोज यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजपाचा सातवा उमेदवार बिनविरोध विजयी झाला आहे. (Municipal elections)