मुंबई : (BMC Elections) मुंबई महापालिका निवडणूकीच्या तोंडावर मनसेला मोठे खिंडार पडले आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सामुहिक राजीनामे देत मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. (BMC Elections)
वॉर्ड क्रमांक ९७ सांताक्रुज विभागातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले. ही जागा उबाठा गटाला गेल्याने ते नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. मनसेच्या स्थापनेपासून हे पदाधिकारी पक्षासोबत होते. त्यांनी १९ वर्ष ९ महिन्याच्या अविस्मरणीय राजकीय प्रवासाला अखेरचा जय महाराष्ट्र केला. (BMC Elections)
हेही वाचा : Pimpri Chinchwad : भाजपाचे चार उमेदवार बिनविरोध; पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये भाजपाने खाते उघडले
प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांमध्ये उपविभाग अध्यक्ष विजय काते, शाखा अध्यक्ष जितेंद्र गावडे, शाखा सचिव भाऊराव विश्वासराव, उपशाखा अध्यक्ष विजय कुलकर्णी, ॲड. अशोक शुक्ला, नरेंद्र कौंडीपूजला, प्रविण पाटील, रोहित गोडीया, अजय कताळे, दत्ताप्रसाद देसाई, मनविसे उपविभाग अध्यक्ष आकाश आवळेकर यांचा समावेश आहे. (BMC Elections)