BMC Elections: भाजप-शिवसेनेच्या प्रचाराचा लवकरच शुभारंभ; वरळीतून फुंकणार रणशिंग

02 Jan 2026 16:07:03



 
BMC Elections
 
मुंबई : (BMC Elections) राज्यातील महानगरपालिका निवडणूकांसाठी भाजप आणि शिवसेनेच्या प्रचाराला उद्यापासून सुरुवात होणार असून वरळीतून या प्रचाराचे नारळ फोडण्यात येणार आहे.
 

शनिवार, ३ जानेवारी रोजी वरळीतील एनएससीआय डोम येथे भाजप-शिवसेना युतीची पहिली भव्य जाहीर सभा पार पडणार आहे. सायंकाळी ६ वाजता या सभेला सुरुवात होणार असून यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करतील. तसेच सर्व बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि उमेदवारही याप्रसंगी उपस्थित असतील. (BMC Elections)
 

हेही वाचा : Municipal elections: भाजपाचे आणखी दोन उमेदवार बिनविरोध विजयी 


 
राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे, तर १६ जानेवारीला निकाल जाहीर होतील. या पार्श्वभूमीवर विविध भागांत सर्वच पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. आजपासून विभागनिहाय सभा आणि भव्य रोड शोच्या माध्यमातून प्रचाराचा धडाका सुरु होणार आहे. दरम्यान, मुंबईत भाजप-शिवसेनेची युती असून या पहिल्या सभेत दोन्ही नेते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष असेल. (BMC Elections)
 

 
Powered By Sangraha 9.0