Eknath Shinde : मुंबईकरांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही - एकनाथ शिंदे

19 Jan 2026 17:46:33
Eknath Shinde
 
मुंबई : (Eknath Shinde) "मुंबईकरांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. मुंबईकरांचा महायुतीलाच कौल आहे. महायुतीचाच महापौर होईल. भाजपा शिवसेना एकत्र लढलेल्या ठिकाणी महायुती म्हणूनच निर्णय घेतला जाईल." असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना केले.(Eknath Shinde)
 
"स्पष्ट आणि पूर्ण बहुमत महायुतीला मिळाले आहे. महायुतीचे ११८ नगरसेवक निवडून आले आहेत. पण उबाठा आमच्या सोबत येतील या अफवा आहेत.महायुतीचा महापौर मुंबई महानगरपालिकेत विराजमान होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात व मुंबईत केलेल्या विकासामुळे संपूर्ण जनतेने आम्हाला आशीर्वाद दिले आहेत." असे प्रतिपादन भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी सोमवार दि.१९ रोजी केले.
 
हेही वाचा : Uttarardh Mahotsav : गुजरातच्या मोढेरा सूर्य मंदिरात ‘उत्तरार्ध महोत्सव’ संपन्न 
 
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकसित महाराष्ट्र आणि विकसित मुंबईच स्वप्न साकार करण्यासाठी जे जे या विकास यात्रेत सहभागी होऊ इच्छितात त्या सर्वांच स्वागत आहे."असेही साटम यांनी स्पष्ट केले.
 
"संजय राऊत काहीही करू शकतात पण टर्म संपल्यावर राज्यसभेवर जाऊ शकत नाहीत. उद्धव ठाकरे यांचे देव कोणते हे माहीत नाही पण महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मन खूप मोठे आहे." असे प्रतिपादन उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
 
 
Powered By Sangraha 9.0