मुंबई : (Western Line Expansion) मुंबईच्या धावत्या जीवनरेषेला आणखी एक बळ मिळाले आहे. पश्चिम रेल्वेने (Western Line Expansion) कांदिवली ते बोरिवलीदरम्यान ३.२१० किलोमीटर लांबीची सहावी रेल्वे लाईन (Western Line Expansion) यशस्वीपणे कार्यान्वित करत मुंबई उपनगरी रेल्वेच्या पायाभूत सुविधांमध्ये ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. १८ जानेवारी २०२६ रोजी पश्चिम विभागाचे रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीआरएस) ई. श्रीनिवास यांच्या यशस्वी तपासणीनंतर या मार्गावर नियमित रेल्वे सेवा सुरू करण्यास अधिकृत मंजुरी देण्यात आली.(Western Line Expansion)
या तपासणीदरम्यान सीआरएस आणि पश्चिम रेल्वेच्या (Western Line Expansion) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नव्या सहाव्या लाईनवर प्रत्यक्ष ट्रॅक निरीक्षण, तांत्रिक पाहणी आणि वेग चाचण्या घेतल्या. त्यानंतर हा मार्ग सुरक्षित आणि प्रवासी सेवेसाठी सज्ज असल्याचे घोषित करण्यात आले.(Western Line Expansion)
हेही वाचा : Aryabhatta Zero Bridge : आर्यभट्टांचा इतिहास मुंबईच्या विकास प्रकल्पावर ठळक
कांदिवली–बोरिवली (Western Line Expansion) हा टप्पा हा वांद्रे टर्मिनस ते बोरिवली या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील अंतिम दुवा आहे. याआधी खार रोड–गोरेगाव (नोव्हेंबर २०२३) आणि गोरेगाव–कांदिवली (ऑक्टोबर २०२४) हे टप्पे कार्यान्वित झाले होते. विशेष म्हणजे, हा अंतिम टप्पा अवघ्या ३० दिवसांत म्हणजे १८ डिसेंबर २०२५ ते १७ जानेवारी २०२६ या कालावधीत पूर्ण करण्यात आला. काटेकोर नियोजन, दिवसरात्र काम आणि विविध विभागांतील उत्कृष्ट समन्वय यामुळे हे शक्य झाले.(Western Line Expansion)
या प्रकल्पांतर्गत (Western Line Expansion) ट्रॅक पुनर्रचना, पुलांची मजबुतीकरणे, आधुनिक सिग्नलिंग यंत्रणा, विद्युतिकरण आणि जमीन संपादन अशी अनेक मोठी कामे करण्यात आली. प्रवाशांना कमीत कमी त्रास होईल याची काळजी घेत बहुतेक कामे रात्रीच्या ब्लॉकमध्ये पार पाडण्यात आली. या सहाव्या लाईनमुळे (Western Line Expansion) उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांचे स्वतंत्र व्यवस्थापन अधिक प्रभावी होणार आहे. त्यामुळे मार्गावरील गर्दी कमी होईल, गाड्यांची वेळापत्रक अचूक होईल आणि देखभाल काळातही सेवा अधिक सुरळीत राहील. लाखो मुंबईकर प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासात यामुळे मोठी सुधारणा होणार आहे. अल्प कालावधीत पूर्ण झालेला हा प्रकल्प म्हणजे पश्चिम रेल्वेच्या (Western Line Expansion) अभियांत्रिकी कौशल्याचा, प्रकल्प व्यवस्थापन क्षमतेचा आणि प्रवासी-केंद्रित दृष्टिकोनाचा ठोस पुरावा आहे. मुंबईची जीवनवाहिनी असलेली पश्चिम रेल्वे भविष्यातही आधुनिक, सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचा हा ठळक संदेश आहे.(Western Line Expansion)