Badruddin Ajmal : काँग्रेसने मुस्लिमांना केवळ मतपेढी म्हणून वापरले!

19 Jan 2026 14:52:47
Badruddin Ajmal
 
मुंबई : (Badruddin Ajmal) ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (एआययूडीएफ) चे प्रमुख मौलाना बदरुद्दीन अजमल (Badruddin Ajmal) यांनी आसाम काँग्रेसवर तीव्र शब्दांत टीका केल्याचे निदर्शनास आले आहे. मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याक समुदायांच्या कल्याणासाठी काँग्रेसने ऐतिहासिकदृष्ट्या कधीही काम केले नाही, उलट त्यांना केवळ मतपेढी म्हणून वापरले, असा आरोप त्यांनी एका पत्रकार परिषदेतून केला आहे. थेट राजकीय हल्ला चढवत अजमल (Badruddin Ajmal) यांनी काँग्रेस नेतृत्वावर मुस्लिमांच्या जीवन व हक्कांबाबत उदासीनता दाखवल्याचा आरोप केला.(Badruddin Ajmal)
 
अजमल (Badruddin Ajmal) यांनी दावा केला की, संकटाच्या काळात विशेषतः अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी ठाम भूमिका घेण्याचे काँग्रेसने सातत्याने टाळले. आसाममध्ये अलीकडे झालेल्या अतिक्रमण हटाव मोहिमांचा संदर्भ देत त्यांनी आरोप केला की, अल्पसंख्याक कुटुंबांवर परिणाम होत असताना काँग्रेस नेतृत्व गप्प बसले. अतिक्रमणाच्या वेळी एकाही काँग्रेस नेत्याने आमच्यासाठी आवाज उठवला नाही किंवा अल्पसंख्याक हितांचे संरक्षण करण्यासाठी पुढाकार घेतला नाही, असे म्हणत त्यांनी निर्णायक क्षणी पक्षाने आपला पारंपरिक आधार सोडल्याचा आरोप केला.(Badruddin Ajmal)
 
हेही वाचा : Dr. Ramchandra Morwanchikar : इतिहासतज्ञ डॉ रा.श्री. मोरवंचीकर काळाच्या पडद्याआड
 
निवडणुकीतील फायद्यासाठी अल्पसंख्याकांना 'भ्रमित' ठेवण्यासाठी नजरकैद छावण्या, परदेशी नागरिकांचा प्रश्न, इ. अशा मुद्द्यांबाबत त्यांना जाणूनबुजून शिक्षित केले गेले नाही, असेही अजमल (Badruddin Ajmal) यांनी सांगितले.(Badruddin Ajmal)
 
 
Powered By Sangraha 9.0