MMRDA : दावोसच्या व्यासपीठावर एमएमआरडीएचा विकास अजेंडा

19 Jan 2026 19:30:15
MMRDA
 
दावोस : (MMRDA) दावोस, स्वित्झर्लंड येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक परिषद २०२६ मध्ये महाराष्ट्राची प्रभावी उपस्थिती नोंदवली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे शिष्टमंडळ या परिषदेत सहभागी झाले असून, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एमएमआरडीए) (MMRDA) उच्चस्तरीय टीम देखील या दौऱ्यात सक्रिय भूमिका बजावत आहे.(MMRDA)
 
एमएमआरडीएचे (MMRDA) महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त महानगर आयुक्त विक्रम कुमार तसेच इतर वरिष्ठ अधिकारी या शिष्टमंडळात सहभागी आहेत. या दौऱ्याचा मुख्य उद्देश मुंबई महानगर प्रदेशातील पायाभूत सुविधा, शहरी वाहतूक, तंत्रज्ञान आणि शाश्वत विकास प्रकल्पांसाठी जागतिक स्तरावरून निधी, कौशल्य आणि आधुनिक तंत्रज्ञान आकर्षित करणे हा आहे.(MMRDA)
 
दावोस येथील आजच्या दिवसातील घडामोडी विशेष महत्त्वाच्या ठरल्या. एमएमआरडीएच्या (MMRDA) टीमने यूकेस्थित अग्रगण्य सल्लागार संस्था ‘क्रॉसरेल इंटरनॅशनल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी पॉल डायसन यांच्याशी धोरणात्मक बैठक घेतली. या बैठकीत मेट्रो, रेल्वे आणि शहरी वाहतूक क्षेत्रातील दीर्घकालीन सहकार्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करण्यात आले. ज्ञान देवाणघेवाण, क्षमता बांधणी आणि जागतिक दर्जाच्या प्रकल्प अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक सहाय्याबाबत सखोल चर्चा झाली. मुंबईतील मेट्रो नेटवर्क अधिक सक्षम, कार्यक्षम आणि भविष्योन्मुख करण्यासाठी ही भागीदारी निर्णायक ठरणार असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.(MMRDA)
 
हेही वाचा : Western Line Expansion : कांदिवली–बोरिवली सहावी लाईन लवकरच कार्यान्वित 
 
यासोबतच एमएमआरडीएच्या (MMRDA) टीमने अमेरिकेतील प्रतिष्ठित बर्कले विद्यापीठाचे प्राध्यापक ख्रिस बुश यांच्याशी संवाद साधला. या चर्चेमधून शैक्षणिक देवाणघेवाण, संयुक्त संशोधन, नवोन्मेषी शहरी उपाययोजना आणि कौशल्य विकासाच्या संधींवर भर देण्यात आला. मुंबईला भारत आणि आशियाची ‘टॅलेंट कॅपिटल’ म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने ही भागीदारी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.(MMRDA)
 
महाराष्ट्राला १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याच्या दिशेने जागतिक आर्थिक मंच २०२६ हे एक निर्णायक व्यासपीठ ठरत आहे. या मंचावरून जागतिक उद्योजक, गुंतवणूकदार आणि धोरणकर्त्यांशी थेट संवाद साधत परकीय गुंतवणूक वाढवणे, औद्योगिक भागीदारी मजबूत करणे, मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती आणि शाश्वत आर्थिक विकासाला गती देणे, हा महाराष्ट्र सरकारचा ठाम संकल्प आहे. दावोस मधील या उच्चस्तरीय बैठका आणि संवादातून मुंबई महानगर प्रदेशाचा विकास जागतिक नकाशावर अधिक ठळकपणे अधोरेखित होत असून, महाराष्ट्राच्या विकासकथेतील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.(MMRDA)
 
 
Powered By Sangraha 9.0