मुंबई : (Literature Festival in Indonesia) इंडोनेशियातील चौथ्या आंतरराष्ट्रीय मिनान्काबाऊ साहित्य महोत्सवासाठी (Literature Festival in Indonesia) नांदेडचे सुपूत्र तथा रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. पृथ्वीराज तौर यांना निमंत्रण देण्यात आले आहे.(Literature Festival in Indonesia) सात दिवस चालणाऱ्या या साहित्य महोत्सवांमध्ये ३० देशातील साहित्यिक निमंत्रित करण्यात आले आहेत. भारतामधून तौर यांना हा सन्मान मिळाल्यामुळे साहित्य वर्तुळामध्ये आनंदाची लहर पसरली आहे.(Literature Festival in Indonesia)
दि. ३ जून ते ७ जून या कालावधीमध्ये इंडोनेशिया (Literature Festival in Indonesia) येथे चालणाऱ्या या साहित्य महोत्सवात विविध चर्चा, परिसंवाद या समवेतच पारंपारिक कला सादरीकरण आणि बहुसंस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मागच्या वर्षी डॉ. पृथ्वीराज तौर यांचा जागतिक पातळीवर साहित्यातील योगदानासाठी वल्ड ऑरगनायझेशन ऑफ रायटर्रस् या संघटनेच्या माध्यमातून गौरव करण्यात आला होता.(Literature Festival in Indonesia)
हेही वाचा : Dr. Ramchandra Morwanchikar : इतिहासतज्ञ डॉ रा.श्री. मोरवंचीकर काळाच्या पडद्याआड
वल्र्ड ओरगनायझेशन ऑफ रायर्टसच्या दुसऱ्या जागतिक परिषदेसाठी रशियामध्ये (Literature Festival in Indonesia) देशविदेशातील लेखकांची मांदियाळी जमली होती. या परिषदेच्या विशेष सत्रामध्ये डॉ. पृथ्वीराज तौर यांनी अनुवादित केलेल्या व प्रा. स्वाती काटे यांनी संपादित केलेल्या ‘ आनंदोत्सवाचा विश्वसेतू’ या संग्रहाचे प्रकाशन इजिप्तचे सुप्रसिद्ध कवी अशराफ दाली आणि आफ्रिका लेखक संघटनेचे महासचिव डॉ. वले ओकेदिरान यांच्या हस्ते करण्यात आले. सदर संग्रहात पंचवीस देशातील चाळीस कवींच्या कवितांचे भाषांतर समाविष्ट करण्यात आले आहे. या जागतिक परिषदेत दुसऱ्या दिवशी डॉ. पृथ्वीराज तौर यांनी ‘ सहलेखक म्हणून अनुवादकाचे अस्तित्व’ या विषयावर व्याख्यान पार पडले. साहित्य तथा शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी डॉ. पृथ्वीराज तौर यांचे अभिनंदन केले.(Literature Festival in Indonesia)
परंपरेचा संवाद प्रस्थापित करण्याची संधी
" इंडोनेशिया आणि भारत या दोन देशांचे संबंध प्राचीन काळापासून आहेत. कोणे एके काळी या देशाने संस्कृतीची वैचारिक भूमिका मांडली होती. अलिकडच्या काळात हा देश मुस्लीमबहुल जरी झाला असला तरी त्यांनी भारतीय तत्तवज्ञान आणि परंपरा जपली आहे. आजही अनेक स्त्रीयांची नावं तिथे शक्ती, सीता, देवी अशी आहेत. संस्कृतचा प्रभाव आजही इथल्या संस्कृतीवर लक्ष्णीय आहे. इंडोनेशिया मधील दोन कवयत्रिंच्या कविता देखील मी अनुवादित केल्या आहेत. त्यामुळे हे निमंत्रण म्हणजे परंपरेचा संवाद प्रस्थापित करण्याची संधी आहे असे मी समजतो."(Literature Festival in Indonesia)
- डॉ. पृथ्वीराज तौर, लेखक