Jignasa Shah: महिला वॉर्डमध्ये जिग्नासा शाह मताधिक्य ठळक; प्रतिस्पर्ध्यांवर निर्णायक मात

18 Jan 2026 17:18:15

Jignasa Shah
 
मुंबई : (Jignasa Shah) महिला राखीव वॉर्डमधील निकालांनी यंदाच्या निवडणुकीत वेगळेच चित्र समोर आणले असून, भारतीय जनता पक्षाच्या जिग्नासा शाह यांनी सर्व महिला उमेदवारांमध्ये सर्वाधिक मताधिक्य मिळवत आपली आघाडी स्पष्ट केली आहे. १५ क्रमांकाच्या वॉर्डमधून जिग्नासा शाह यांनी उबाठाच्या जयश्री बंगेरा यांचा पराभव करत मिळवलेले मताधिक्य हे महिला वॉर्डमधील सर्वांत मोठे ठरले. त्यामुळे महिला मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने गेला, हे या निकालातून अधोरेखित झाले आहे. महिलांचा मतदानातील सहभाग वाढावा यासाठी यंदा विशेष प्रयत्न करण्यात आले होते. (Jignasa Shah)
 
लाडकी बहीण योजनेसह विविध महिलाभिमुख योजनांचा प्रचार करण्यात आला. त्यासोबतच महिलांचा मतदानाचा आत्मविश्वास वाढावा यासाठी ‘पिंक मतदान केंद्रां’ची संकल्पना राबविण्यात आली. या केंद्रांवर केवळ महिला कर्मचारी कार्यरत होत्या. तसेच निवडणूक प्रक्रियेत महिलांचा सक्रिय सहभाग वाढावा यासाठी महिला राखीव वॉर्डची रचना करण्यात आली होती. परिणामी, या वॉर्डमधील मतदान आणि निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले होते. (Jignasa Shah)
 
हेही वाचा : Navnath Ban: घरात बसणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाहीत : नवनाथ बन
 
या पार्श्वभूमीवर १५ वॉर्डमधील निकाल महत्त्वाचा ठरला.जिग्नासा शाह यांनी मिळवलेले मताधिक्य हे केवळ विजयापुरते मर्यादित न राहता, महिला वॉर्डमधील भाजपची ताकद दर्शविणारे ठरले. त्यांच्या पाठोपाठ १३१ क्रमांकाच्या वॉर्डमधून राखी जाधव यांनी उबाठाच्या वृषाली चावक यांचा पराभव केला तसेच भाजपच्या १३२ च्या रितू तावडे यांनी उबाठाच्या क्रांती मोहिते यांचा पराभव करत १९,८१० मते मिळवली. मात्र, मताधिक्याच्या बाबतीत जिग्नासा शाह या सर्वांपेक्षा पुढे राहिल्या. (Jignasa Shah)
 
चौथ्या क्रमांकावर ४६ क्रमांकाच्या वॉर्डमधून भाजपच्या योगिता कोळी यांनी मनसेच्या स्नेहिता डेहलीकर यांचा पराभव करत १९,७६६ मतांनी विजय मिळवला. तरीही, महिला वॉर्डमधील सर्वाधिक मतसंख्या आणि ठळक मताधिक्य हे जिग्नासा शाह यांच्या वाट्याला आल्याने त्यांचा विजय अधिक लक्षवेधी ठरला आहे. (Jignasa Shah)
 
 
Powered By Sangraha 9.0