Western Railway : पश्चिम रेल्वेकडून मुंबईकरांसाठी दिलासादायक निर्णय

17 Jan 2026 18:47:10
Western Railway
 
मुंबई : (Western Railway) मुंबईकर प्रवाशांची वाढती मागणी आणि एसी लोकलला मिळणारा चांगला प्रतिसाद लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. सोमवार, दि.२६ जानेवारी २०२६पासून मुंबई उपनगरीय मार्गावर १२ नवीन एसी लोकल ट्रेन सेवा सुरू करण्यात येणार असून, त्यामुळे एकूण एसी लोकल (Western Railway) सेवांची संख्या १०९ वरून १२१ इतकी होणार आहे.(Western Railway)
 
पश्चिम रेल्वेने (Western Railway) दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही काळात एसी लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांची संख्या लक्षणीय वाढली आहे. गर्दी कमी करण्यासाठी आणि प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी, विद्यमान नॉन-एसी १२ डब्यांच्या लोकल सेवांचे रूपांतर एसी सेवांमध्ये करण्यात येत आहे. या सर्व एसी लोकल सेवा आठवड्याचे सातही दिवस धावणार आहेत. (Western Railway) महत्त्वाचे म्हणजे, एकूण लोकल फेऱ्यांच्या संख्येत कोणताही बदल होणार नाही. पश्चिम रेल्वे मार्गावर दररोज एकूण १४०६ लोकल सेवा धावतात, त्यामध्ये आता १२१ एसी लोकल सेवांचा समावेश असेल.(Western Railway)
 
हेही वाचा : JNPA : जेएनपीएत हवेची गुणवत्ता लक्षणीय सुधारली 
 
नवीन सुरू होणाऱ्या १२ एसी लोकलपैकी (Western Railway) ६ सेवा ‘अप’ मार्गावर (उपनगरातून चर्चगेटकडे) आणि ६ सेवा ‘डाउन’ मार्गावर (चर्चगेटहून उपनगरांकडे) असतील.अप मार्गावर विरार–चर्चगेट आणि गोरेगाव–चर्चगेट दरम्यान प्रत्येकी २ सेवा, तर बोरीवली–चर्चगेट आणि भाईंदर–चर्चगेट दरम्यान प्रत्येकी १ सेवा धावणार आहेत.त्याचप्रमाणे, डाउन मार्गावर चर्चगेट–विरार आणि चर्चगेट–गोरेगाव दरम्यान प्रत्येकी २ सेवा, तर चर्चगेट–बोरीवली आणि चर्चगेट–भाईंदर दरम्यान प्रत्येकी १ सेवा सुरू होणार आहेत.(Western Railway)
 
दैनंदिन धावपळीच्या मुंबईकरांसाठी हा निर्णय निश्चितच दिलासादायक ठरणार असून, गर्दीच्या वेळेत अधिक आरामदायी, सुरक्षित आणि सुसह्य प्रवासाचा अनुभव मिळण्यास मदत होणार आहे. नवीन एसी लोकल सेवांचे सविस्तर वेळापत्रक परिशिष्टमध्ये जाहीर करण्यात येणार आहे.(Western Railway)
 
 
Powered By Sangraha 9.0