मुंबई : (Nitesh Rane) मुंबईत 'आय लव्ह महादेव' आणि 'जय श्री राम' विचारांचा हिंदू, मराठी आणि महायुतीचाच महापौर बसेल हे निवडणूकीच्या प्रचाराच्या आधीपासून वारंवार मी बोलत होतो. मुंबईकरांनी आम्हाला साथ दिली. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर आणि महायुतीच्या सहकाऱ्यांवर विश्वास ठेवला आणि आता लवकरच जय श्री राम म्हणत मुंबई महापालिकेत आमचा महापौर बसवू, अशी प्रतिक्रिया मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिली.(Nitesh Rane)
माध्यमांशी बोलताना मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले की, "उद्धव ठाकरे यांनी मुंबईचा विकास न करता विरोधकांची घरे तोडणे, त्यांच्यावर कारवाया करणे यासाठीच मुंबई महापालिकेची सत्ता वापरली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना रोज मुंबई महापालिका आयुक्तांना फोन करून राणे (Nitesh Rane) का घर तोडो, असे सांगायचे. त्यामुळेच मी त्यांना एक विशेष प्रतिक्रिया दिली. त्यांना महापालिका चंगेज मुलतानीच्या घशात टाकणे चालते, बुरखेवाली महापौरही चालली असती, परंतू, ज्या अदानींच्या माध्यमातून मुंबईचा विकास होईल, ते यांना चालत नाही. त्यामुळे जे मुंबईचा विकास करतील त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम करू," असेही ते म्हणाले.(Nitesh Rane)
हिंदूंमध्ये फुट पाडण्यासाठीच ठाकरे बंधूंना सुपाऱ्या
"ज्या शिर्केंनी छत्रपती संभाजीराजांची माहिती मुघलांना दिली आणि त्यांना संगमेश्वरमध्ये पकडले. त्यांच्यात आणि ठाकरे बंधू आणि त्यांच्या पिलावळीत फरक नाही. पाकिस्तानमध्ये बसलेल्या अब्बाची स्क्रिप्ट ते मुंबईत वाचून दाखवत होते. हिंदूंमध्ये फुट पाडण्यासाठीच ठाकरे बंधूंना सुपाऱ्या दिल्या होत्या. त्यामुळे आता दुसऱ्यांना बोलण्याऐवजी तुम्ही ज्यांची दाढी कुरवाळत होते त्यांना उत्तर द्या. मुंबईत हिंदू एकत्रित आला आहे. आता पाच वर्षांत आम्ही बांग्लादेशी-रोहिंग्यांची संख्या कमी करणार आहोत," असेही त्यांनी सांगितले.(Nitesh Rane)