
मुंबई: (Valsa Nair) भारतीय प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी वल्सा नायर-सिंग यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या अध्यक्षपदाची व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांच्यासह सबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.