मुंबई : (Bangladesh) बांगलादेशात (Bangladesh) दर दिवसाला हिंदूंच्या हत्या केल्या जात आहेत. नुकतीच आणखी एका हिंदू तरूणाची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. राजबारी जिल्ह्यातील गोआंडा येथील करीम पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याचे काम करणाऱ्या रिपन साहा या हिंदू युवकाला गाडीने उडवून ठार करण्यात आले. याप्रकरणी अबुल हाशेम उर्फ सुजान आणि गाडी चालक कमाल हुसेन यांना अटक करण्यात आली.(Bangladesh)
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे ४:३० वाजताच्या सुमारास एक काळी एसयूव्ही पेट्रोल पंपाजवळ आली. गाडीत अंदाजे ५,००० रुपये किमतीचे इंधन भरले आणि पैसे न देता निघून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी गाडीत पेट्रोल भरणाऱ्या रिपन साहाने थांबवण्याचा प्रयत्न केला असता गाडी चालक कमाल हुसेन याने रिपनच्या अंगावर गाडी घालवून चिरडले. यामध्ये रिपनचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी वाहन जप्त करत आणि मालक अबुल हाशेम आणि चालक कमाल हुसेन यांना अटक केली.(Bangladesh)
आरोपींचा राजकीय संबंध
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अबुल हाशेम हा कंत्राटदार आहे आणि यापूर्वी तो बांगलादेश (Bangladesh) नॅशनलिस्ट पार्टी ( बीएनपी) चा राजबारी जिल्हा कोषाध्यक्ष होता. तो जिल्हा युवा दलाचा अध्यक्ष म्हणूनही काम करत होता.(Bangladesh)
हेही वाचा : Bhai Jagtap: काँग्रेस आमदार भाई जगताप यांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस! नेमकं प्रकरण काय?
या महिन्याच्या सुरुवातीला बांगलादेश हिंदू-बौद्ध-ख्रिश्चन एकता परिषदेने ( BHBCUC) आरोप केला होता की सार्वत्रिक निवडणुका जवळ येत असताना देशात जातीय हिंसाचार झपाट्याने वाढत आहे. अल्पसंख्याक मतदारांना त्यांच्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान करू नये म्हणून त्यांना धमकावण्यासाठी ही हिंसाचार केला जात आहे.(Bangladesh)
इतर अलीकडील प्रकरणे
२ डिसेंबर - येथे ४२ वर्षीय ज्वेलर्स प्रांतोष सरकार यांची गोळ्या घालून हत्या
१८ डिसेंबर - २५ वर्षीय दीपू चंद्र दास यांना मैमनसिंग येथे जमावाने मारहाण करून ठार मारले
२४ डिसेंबर - राजबारी येथे अमृत मंडल यांची खंडणीच्या आरोपाखाली हत्या करण्यात आली
३१ डिसेंबर - खोकण चंद्र दास यांच्यावर हल्ला करून त्यांना जाळण्यात आले
५ जानेवारी - किराणा दुकानदार मोनी चक्रवर्ती यांची धारदार शस्त्राने वार करून हत्या
६ जानेवारी - चोरीच्या आरोपात मिथुन सरकार यांचा कालव्यात ढकलून मृत्यू
७ डिसेंबर - मिथुन सरकार यांच्या घरातील योगेश चंद्र रॉय आणि त्यांच्या पत्नीची हत्या