Sanjay Raut: राऊतांचं अजब विश्लेषण, काँग्रेसमुळे ठाकरेंना फायदाच झाला!

17 Jan 2026 15:22:12

मुंबई : (Sanjay Raut) मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या निकालांनंतर राजकीय वातावरण तापले असतानाच शिवसेना (उबाठा) नेते खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. “काँग्रेस आणि ठाकरे एकत्र असते, तर चित्र वेगळंच असतं. काँग्रेसची रणनीती योग्य होती” असे राऊत यांनी नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत म्हटले आहे. (Sanjay Raut)

भाजप–शिंदे गटाच्या यशानंतर विरोधकांकडून आत्मपरीक्षण सुरू असताना, राऊत यांनी काँग्रेसवर टीका करण्याऐवजी उलट त्यांच्या रणनीतीचे कौतुक केले. “काँग्रेसची रणनीती योग्य होती आणि त्या रणनीतीचा ठाकरेंना फायदाच झाला” असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत समीकरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (Sanjay Raut)


Powered By Sangraha 9.0