Pune Municipal Corporation: आंदेकर कुटुंबातील महिला विजयी

17 Jan 2026 16:26:52

पुणे : (Pune Municipal Corporation)
पुणे महापालिकेची निवडणूक अनेक कारणांनी महानगरपालिका निवडणूक चर्चेत आली होती. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षाकडून आयुष कोमकर हत्याप्रकरणात तुरुंगात असलेल्या सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर यांना महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली होती. प्रभाग क्रमांक 23 मधून सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. सोनाली आंदेकरसह लक्ष्मी आंदेकरचा निवडणुकीत विजय झाला आहे, तर याच प्रभागातून शिवसेना नेते आणि माजी आ. रविंद्र धंगेकर यांची पत्नी प्रतिभा धंगेकरदेखील निवडणुकीच्या रिंगणात होत्या. मात्र, त्यांचाही पराभव झालेला आहे. तुरुंगातून निवडणूक लढवणाऱ्या सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर या दोघी विजयी झाल्या आहेत. प्रभाग क्रमांक 23 मधून दोघी निवडणूक लढवत होत्या. सोनाली आंदेकरला पोस्टल मते सात, तर लक्ष्मी आंदेकरला पोस्टल मते आठ मिळाली आहेत. सोनाली आंदेकर या हत्या झालेल्या वनराज आंदेकर यांच्या पत्नी आहेत. आंदेकर कुटुंबातील दोघांना अजित पवारांनी उमेदवारी दिल्याने ते चांगलेच चर्चेत आले होते. बंडू आंदेकरला उमेदवारी अर्ज दाखल करताना मिरवणूक, भाषण, घोषणाबाजी करायला न्यायालयाने मनाई केली आहे. (Pune Municipal Corporation)


Powered By Sangraha 9.0