Pune Municipal Corporation: महाविजय पिंपरी-चिंचवडकरांना समर्पित

17 Jan 2026 16:37:30

पुणे : (Pune Municipal Corporation) “पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या जाहीर झालेल्या निकालांकडे पाहता, पिंपरी-चिंचवडकरांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षावर ठाम विश्वास व्यक्त केला असून, भाजपचा एकहाती महापौर बसवण्याचा मार्ग मोकळा झाला. स्वाभिमानी पिंपरी-चिंचवडकरांना आम्ही साद घातली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व आणि भारतीय जनता पक्षाच्या पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली मिळालेला हा महाविजय स्वाभिमानी पिंपरी-चिंचवडकरांना समर्पित आहे,” अशी भावनिक प्रतिक्रिया भाजप नेते तथा आ. महेश लांडगे यांनी दिली आहे. यावेळी बोलताना आ. महेश लांडगे म्हणाले की, “देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे सक्षम, दूरदश नेतृत्व माननीय देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवत पिंपरी-चिंचवडकरांनी भारतीय जनता पक्षाला स्पष्ट आणि निर्णायक कौल दिला आहे. हा कौल म्हणजे विकासकामांना, प्रामाणिक प्रशासनाला आणि जनहिताला दिलेली ठाम पोचपावती आहे. हा विजय केवळ भारतीय जनता पक्षाचा नाही, तर हा विजय पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येक स्वाभिमानी नागरिकाचा आहे.” (Pune Municipal Corporation)

तसेच, “भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, निवडणूक प्रमुख तथा आ. शंकर जगताप, विधान परिषद आ. उमा खापरे, विधान परिषद आ. अमित गोरखे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, नेते आणि मार्गदर्शक यांच्यासह भाजप परिवारातील विविध संस्था, संघटना यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हा महाविजय शक्य झाला. या विचारांच्या आणि विकासाच्या लढाईमध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष योगदान दिलेल्या प्रत्येकाचा मी ऋणी आहे,” असेही आ. लांडगे यांनी म्हटले आहे. तसेच पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने, पदाधिकाऱ्याने आणि नेत्यांनी प्रामाणिकपणे केलेल्या मेहनतीचा हा सन्मान आहे. घराघरांत जाऊन केलेला संवाद, लोकांशी निर्माण केलेला विश्वास आणि संघटनात्मक ताकदीमुळेच आज हे यश शक्य झाले आहे. सर्वांगीण, नियोजित आणि शाश्वत विकासासाठी भारतीय जनता पक्ष पूर्णतः कटिबद्ध असून, नागरिकांनी दाखवलेला हा विश्वास अधिक जबाबदारीने जपला जाईल. (Pune Municipal Corporation)


Powered By Sangraha 9.0