Pune Municipal Corporation: नागरिकांनी स्वीकारले विकासाचे व्हिजन

17 Jan 2026 16:11:45

पुणे : (Pune Municipal Corporation)
“भारतीय जनता पक्षाने निवडणूक प्रचार प्रमुख म्हणून दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडली. पक्षाने दिलेला विश्वास सुज्ञ मतदारांमुळे सार्थ ठरला आहे. निवडणूक विकासाच्या विरोधात लढवली गेली; मात्र नागरिकांनी विकासाचे व्हिजन स्वीकारले. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ही विकासाची घोडदौड आता कायम राहणार आहे. आगामी काळात नियोजन, व्यवस्थापन आणि अंमलबजावणी अशी त्रिसूत्री वापरून शहराचा विकासाचा आलेख उंचावत नेणार,” अशी ग्वाही निवडणूक प्रचार प्रमुख तथा आ. शंकर जगताप यांनी दिली. (Pune Municipal Corporation)

पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 निमित्ताने संवाद साधताना निवडणूक प्रचार प्रमुख आ. शंकर जगताप म्हणाले, “दि. 15 जानेवारी रोजी मतदान पार पडले. दि. 16 जानेवारी रोजी या निवडणुकीचा निकाल घोषित करण्यात आला. यामध्ये भारतीय जनता पक्षाला पिंपरी-चिंचवडमधील सुज्ञ नागरिकांनी भरभरून कौल दिला आहे. याबद्दल भारतीय जनता पक्ष सर्व पिंपरी-चिंचवडकरांचा मनःपूर्वक आभारी आहे.” याबाबत शंकर जगताप म्हणाले, “पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध आहे.” (Pune Municipal Corporation)


Powered By Sangraha 9.0