पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपने मोठा विजय मिळवत बहुमत मिळविले असून सायंकाळी 10.30 वाजेपर्यंत भाजपने 123 हून अधिक जागांवर विजय मिळवला आहे, तर पिंपरी-चिंचवडमध्ये 84 जागांवर विजय मिळवला. काही जागांचे निकाल रात्री उशिरा हाती येणार होते. या दोन्ही महापालिकांमध्ये भाजपने स्पष्ट बहुमत मिळविल्याने महानगरातील विकासकामांना आता गती देणार असल्याचे या निवडणुकीचे विजयाचे शिल्पकार मुरलीधर मोहोळ, चंद्रकांतदादा पाटील, आ. महेश लांडगे, आ. अमित गोरखे आणि आ. शंकर जगताप यांनी सांगितले. (Pune Municipal Corporation)
पुणे: (Pune Municipal Corporation) भाजपने प्रचाराचे केलेले नियोजन आणि विकासकामांवर दिलेला जोर यांमुळे भाजपला ही निवडणूक सहज जिंकता आली. महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदेसेना स्वबळावर लढत असून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी केली आहे. भाजप, शिंदेसेना, दोन्ही राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात लढले. तसेच काँग्रेस-उद्धवसेना-मनसे या चौरंगी लढतींमुळे निवडणुकीत रंगत आली. अजित पवारांनी दोन्ही पालिकांत सत्ता मिळवण्याच्या दृष्टीने सभांचा धडाका लावला होता. (Pune Municipal Corporation)
दोन्हीकडे भाजपवर टीका केली होती. दोन्ही पालिकांत नागरिकांनी भाजपला सत्तेची संधी दिली आहे. त्यामळे अजित पवारांचे सत्ता मिळवण्याचे स्वप्न भंगले आहे. अनेकजण राजकीय पक्ष बदलून निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत. त्यामळे अनेक प्रभागांमध्ये माजी नगरसेवक एकमेकांच्या विरोधात उभे राहिले होते. परंतु, भाजपच्या योग्य आणि संयमी नियोजनामुळे भाजपला दोन्ही पालिकांत सहज विजय मिळवता आला. विशेष म्हणजे, या निवडणुकीत अनेक दिग्गज उमेदवारांना मतदारांनी धुळ चारली आहे. (Pune Municipal Corporation)
विरोधक म्हणून कोणीही प्रभावी नेता आता महापालिकेत असणार नाही, हेदेखील यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे; तथापि शरद पवार गटातून काँग्रेसमध्ये आलेले प्रशांत जगताप या आक्रमक नेत्याने मात्र विजय मिळविला असून गेल्या वेळी (2017) नऊ जागांवर विजय मिळविलेल्या काँग्रेस पक्षाला या निवडणुकीत 16 ठिकाणी आपले उमेदवार निवडून आणण्यात यश आले आहे. तथापि दोन्ही राष्ट्रवादीची मात्र घसरण झाली. आधीच्या (2017) निवडणुकीत राष्ट्रवादी काँगेस पुण्यात 39 जागा राखून होती. यंदा मात्र दोन्ही राष्ट्रवादी मिळून ही संख्या 24 आहे.उबाठा आणि मनसेची धुळधाण झाली असल्याचे या निकालातून दिसून येत आहे. निकालानंतर प्रतयेक प्रभागात महानगरात विजयी उमेदवारांनी आनंद साजरा केला. (Pune Municipal Corporation)
अनेक ठिकाणी गुलाल आणिढोल-ताशांच्या, तर डीजेच्या गजरात कार्यकर्ते जल्लोष करीत होते.
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपचा स्वबळाचा सूर
पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाची महत्त्वाची बैठक केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थित पार पडली. आगामी निवडणुकीच्या रणनीतीसंदर्भात आणि उमेदवार निवडीसंदर्भात सविस्तर चर्चा झाली. पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक भारतीय जनता पक्षाने स्वबळावर लढायला हवी, असा सूर या बैठकीत उमटला. या बैठकीला पुणे उत्तर आणि दक्षिणचे जिल्हाध्यक्षांसह प्रमुख नेते, पदाधिकारी उपस्थित होते. (Pune Municipal Corporation)
(2026)
भाजप 123
राष्ट्रवादी 21
श.प. 03
काँग्रेस 16
उबाठा 1
(2017) भाजप 97
राष्ट्रवादी 39
शिवसेना 10
काँग्रेस 9
इतर 7