Mumbai Local: मुंबई लोकलच्या भविष्याला गती, एमयूटीपी टप्पा २च्या सुधारित आराखड्याला मंजुरी

17 Jan 2026 21:03:07

मुंबई : (Mumbai Local) मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाशी थेट जोडलेल्या मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा-२साठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रकल्पाच्या सुधारित ८,०८७.११ कोटी रुपयांच्या वित्तीय आराखड्यास मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.(Mumbai Local)

मुंबईची उपनगरीय रेल्वे (Mumbai Local) ही शहराची जीवनवाहिनी मानली जाते. वाढती लोकसंख्या, प्रवाशांची गर्दी आणि पायाभूत सुविधांवरील ताण लक्षात घेता एमयूटीपी टप्पा २ हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. यापूर्वी ५,३०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला महाराष्ट्र शासन आणि रेल्वे मंत्रालयाची मान्यता होती. प्रकल्पाची अंमलबजावणी एमयूटीपी टप्पा २A आणि एमयूटीपी टप्पा २B अशा दोन टप्प्यांत विभागण्यात आली होती. (Mumbai Local) त्यापैकी एमयूटीपी टप्पा २A साठी जागतिक बँकेकडून अंशतः निधी, तर उर्वरित निधी राज्य शासन व रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात येणार होता. एमयूटीपी टप्पा २B साठी राज्य शासन आणि रेल्वे मंत्रालयाने समप्रमाणात निधी उभारण्याचे ठरवले होते.(Mumbai Local)

आता सुधारित वित्तीय आराखड्यास वांद्रे (पूर्व) येथील रेल्वेच्या मौल्यवान जमिनीच्या जलद व्यावसायिक विकासाच्या अटीवर मान्यता देण्यात आली आहे. याचबरोबर राज्य शासनाच्या वाट्याच्या खर्चासाठी एमएमआरडीएकडून देण्यात आलेल्या ६४६.९५ कोटी रुपयांच्या अतिरिक्त रकमेलाही अधिकृत मान्यता मिळाली आहे. दरम्यान, उपनगरीय रेल्वे तिकीटावरील अधिभारातून मुंबई रेल्वे (Mumbai Local) विकास महामंडळाकडे जमा झालेल्या १,६५२.०५ कोटी रुपयांचाही या प्रकल्पासाठी वापर करण्यात आला आहे. ही रक्कम राज्य शासनाच्या हिस्स्यात समायोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.(Mumbai Local)
 
हेही वाचा : Mumbai Police Housing Township : ‘मुंबई पोलीस हाऊसिंग टाऊनशिप’ला मंजुरी 

वांद्रे (पूर्व) येथील रेल्वे (Mumbai Local) जमिनीच्या व्यावसायिक विकासातून मिळणारा निधी एमयूटीपी टप्पा २च्या खर्चासाठी वापरला जाणार असून, उर्वरित निधी एमयूटीपी टप्पा 3, 3A आणि 3B या आगामी प्रकल्पांसाठी राज्य शासनाच्या हिस्स्यापोटी वापरण्यात येणार आहे. त्यासाठी रेल्वे (Mumbai Local) बोर्ड, राज्य शासन, एमआरव्हीसी आणि रेल्वे भूमी विकास प्राधिकरण यांच्यात आवश्यकतेनुसार सामंजस्य करार करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे.(Mumbai Local)

विशेष म्हणजे, या व्यावसायिक विकासातून मिळणाऱ्या निधीपैकी एक तृतीयांश हिस्सा राज्य शासनाचा असेल आणि तो केवळ नागरी परिवहन प्रकल्पांसाठीच वापरण्यात येणार आहे. हा निधी नगर विकास विभागाच्या अधिनस्त असलेल्या नागरी परिवहन निधीत जमा करून मुंबईकरांच्या प्रवासाला अधिक सुरक्षित, जलद आणि आरामदायी बनवण्याच्या दिशेने वापरण्यात येणार आहे. हा निर्णय म्हणजे मुंबई लोकलच्या (Mumbai Local) पायाभूत सुविधांना नवी चालना देणारा आणि भविष्यातील प्रवास अधिक सुलभ करणारा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.(Mumbai Local)


Powered By Sangraha 9.0