BMC Elections : मुंबई महापालिकेत तब्बल १ लाख ३२७ मतदारांनी निवडला 'नोटा'चा पर्याय

    17-Jan-2026   
Total Views |
BMC Elections
 
मुंबई : (BMC Elections) कोणतीही निवडणूक (BMC Elections) असली की, मतदानावेळी 'नोटा' नावाचे एक बटण असते. एखाद्या मतदाराला राजकीय पक्षांनी दिलेल्या उमेदवारांपैकी कोणताच उमेदवार आवडला नसेल, तर त्यासाठी निवडणूक आयोगाने एक व्यवस्था केली आहे. अशावेळी ते 'नोटा'चे बटण दाबू शकतात. नोटाचा अर्थ 'यापैकी काहीही नाही' असा होतो. नुकत्याच पार पडलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणूकीत (BMC Elections) तब्बल १ लाख ३२७ मतदारांनी नोटा चा पर्याय निवडला आहे.(BMC Elections)
 
प्रभाग २२६ मध्ये सर्वाधिक मतदान 'नोटा'ला
 
प्रभाग क्रमांक २२६ मध्ये सर्वाधिक १ हजार ४०४ मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला. या प्रभागातून भाजपचे अॅड. मकरंद नार्वेकर विजयी झाले आहेत. त्यांच्या विरोधात तेजल पवार या अपक्ष उमेदवार होत्या. प्रभाग क्रमांक १०७ मध्ये दुसऱ्या क्रमांकाची म्हणजेच १ हजार १७९ मते नोटाला मिळाली आहेत. या प्रभागातून भाजपचे डॉ. नील किरीट सोमय्या विजयी झाले आहेत. त्या खालोखाल प्रभाग क्रमांक १५ मध्ये १ हजार १२२ मतदारांनी नोटाला मतदान केले. या प्रभागातही भाजपच्या जिग्नासा शाह यांनी विजय मिळवला. तर प्रभाग क्रमांक ४६ मध्ये ९८० मते नोटाला मिळाली असून इथे भाजपच्या योगिता कोळी यांचा विजय झाला आहे. तसेच प्रभाग क्रमांक २७ मध्ये भाजपच्या नीलम गुरव या विजयी झाल्या असून या प्रभागात ९४० मतदारांनी नोटाला मतदान केले.(BMC Elections)
 
 हेही वाचा : लवकरच 'जय श्री राम' म्हणत मुंबई महापालिकेत आमचा महापौर बसवू - मंत्री नितेश राणे
 
सर्वात कमी नोटा मतदान झालेले प्रभाग कोणते?
 
प्रभाग क्रमांक १३४ मध्ये सर्वात कमी ७६ लोकांनी नोटाचा पर्याय निवडला असून इथे एमआयएम पक्षाचे मेहजाबीन अतिक अहमद खान विजयी झालेत. प्रभाग क्रमांक १३६ मध्ये १२४ इतके मतदान नोटाला झाले असून एमआयएम पक्षाचे मो. जमिर कुरेशी इथून निवडून आलेत. प्रभाग क्रमांक १३८ मध्येही १२४ जणांनी नोटाचा पर्याय निवडला. या प्रभागात एमआयएम पक्षाचे रोशन इरफान शेख विजयी झालेत. प्रभाग क्रमांक १३५ मध्ये १३७ मते नोटाला मिळाली असून भाजपचे नवनाथ बन यांनी विजय मिळवला.(BMC Elections) यासोबतच प्रभाग क्रमांक १८५ मध्ये १३९ लोकांनी नोटाचे बटण दाबले आहे. इथे उबाठा गटाचे टी. एम. जगदीश विजयी झालेत.(BMC Elections)
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....