ठाणे : (Chief Minister's Panchayat Raj Campaign) पंचायत समिती अंबरनाथ अंतर्गत विविध ग्रामपंचायतींमध्ये सुरू असलेल्या विकास कामांची तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान (Chief Minister's Panchayat Raj Campaign) अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी दि.१६ जानेवारी, २०२६ रोजी अंबरनाथ तालुक्याचा दौरा केला.(Chief Minister's Panchayat Raj Campaign)
या दौऱ्यादरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्वप्रथम ग्रामपंचायत पोसरी येथे भेट देऊन चिरड–वनराई बंधाऱ्याची पाहणी केली. पाणीसंधारणाच्या दृष्टीने या बंधाऱ्यांचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी देखभाल व दुरुस्तीबाबत आवश्यक सूचना दिल्या. यासोबतच जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी तसेच भटक्या श्वानांसाठी उभारण्यात आलेल्या शेल्टरची पाहणी करून संबंधित यंत्रणांना आवश्यक मार्गदर्शन केले.(Chief Minister's Panchayat Raj Campaign)
त्यानंतर ग्रामपंचायत हाजीमलंगवाडी येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व ग्रामपंचायत कार्यालयाची पाहणी करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायतीच्या घंटागाडीचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. स्वच्छता व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने घंटागाडीचा योग्य वापर करून गाव स्वच्छ ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.(Chief Minister's Panchayat Raj Campaign)
यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र मांगरुळ येथे भेट देऊन आरोग्य सुविधांचा आढावा घेण्यात आला. नागरिकांना वेळेवर व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याबाबत आरोग्य यंत्रणेला आवश्यक सूचना देण्यात आल्या.(Chief Minister's Panchayat Raj Campaign)
हेही वाचा : Sanjay Raut: राऊतांचं अजब विश्लेषण, काँग्रेसमुळे ठाकरेंना फायदाच झाला!
दौऱ्याच्या पुढील टप्प्यात ग्रामपंचायत नेवाळी येथे कचरा विल्हेवाट व्यवस्थेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. घनकचरा व ओला–सुका कचरा वर्गीकरण, वैज्ञानिक पद्धतीने कचरा व्यवस्थापन तसेच स्वच्छ भारत अभियानाशी सुसंगत उपक्रम राबविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.(Chief Minister's Panchayat Raj Campaign)
या दौऱ्यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं.स.) प्रमोद काळे, गट विकास अधिकारी अजित देसाई, उप अभियंता सूर्यवंशी, गट शिक्षणाधिकारी विशाल पोतेकर, पशुधन अधिकारी अहिरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहिते, वैद्यकीय अधिकारी डॉ. उपाध्ये, ग्रामपंचायत अधिकारी विजय बढे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.(Chief Minister's Panchayat Raj Campaign)
मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी यावेळी बोलताना सांगितले की, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान (Chief Minister's Panchayat Raj Campaign) यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायतींनी नियोजनबद्ध पद्धतीने कामकाज करावे. शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा व पर्यावरण संवर्धन या क्षेत्रांमध्ये दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे ही जिल्हा परिषदेची प्राथमिकता असून, सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून गावांचा सर्वांगीण विकास साधावा, असे निर्देश त्यांनी दिले.(Chief Minister's Panchayat Raj Campaign)