Bhai Jagtap: काँग्रेस आमदार भाई जगताप यांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस! नेमकं प्रकरण काय?

17 Jan 2026 19:53:21
 Bhai Jagtap
 
मुंबई : (Bhai Jagtap) मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ मधील पराभवानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह उफाळून आला आहे. काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्यावर थेट निशाणा साधत “पराभवाची जबाबदारी स्वीकारून त्यांनी मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा,” असे पक्षविरोधी वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे पक्षात खळबळ उडाली असून, काँग्रेस पक्षाने भाई जगताप यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. (Bhai Jagtap)
 
हेही वाचा :  Raj Thackeray: अपेक्षित यश मिळालं नसलं याचं दुःख आहे : राज ठाकरे
 
माध्यमांवरून मिळालेल्या माहितीनुसार, पक्षविरोधी वक्तव्य केल्याच्या कारणावरून त्यांना ही नोटीस पाठवण्यात आली असून, सात दिवसांच्या आत आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नोटीस मिळाल्यानंतर आता भाई जगताप काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Bhai Jagtap)
 
 
Powered By Sangraha 9.0