मुंबई : (US Imposes Visa Ban) अमेरिकेत ट्रम्प प्रशासनाने दि. २१ जानेवारीपासून जगभरातील ७५ देशांसाठीची व्हिसा (US Imposes Visa Ban) प्रक्रिया बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पाकिस्तान आणि बांगलादेशसह भारताच्या सहा शेजारी देशांचाही समावेश आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने जोपर्यंत अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाची अर्ज छाननी पूर्ण होत नाहीत, तोवर नवीन अर्ज नाकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.(US Imposes Visa Ban)
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने या मागील कारण स्पष्ट करताना, अमेरिकेत बाहेरुन येणारे नागरिक सवलतीच्या दरात कल्याणकारी योजनांचा लाभ घेत असल्याचे समोर आल्याचे म्हटले आहे. त्यामुळे अमेरिकेच्या नागरिकांचे हित सुनिश्चित करणे आवश्यक झाले आहे. जोवर नवीन येणारे स्थलांतरित या सेवांचा गैरफायदा घेणार नाहीत हे सुनिश्चित होत नाही, तोवर व्हिसा (US Imposes Visa Ban) प्रक्रिया पुन्हा सुरु करणार नसल्याचेही अमेरिका परराष्ट्र मंत्रालयाच्यावतीने जाहीर करण्यात आले.(US Imposes Visa Ban)
हेही वाचा : Mumbai BMC Election Results 2026 Live : भाजपला धक्का! वॉर्ड क्रमांक १८५मधून रवी राजा पराभूत, उबाठाने मारलं मैदान!
राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यापासून ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अशी व्हिसा बंदी आणली आहे. ट्रम्प यांनी सत्तेत आल्यापासून अमेरिकेत स्थलांतरण नियम अधिक कडक केले आहेत. गेल्यावष नोव्हेंबर महिन्यात व्हाईट हाऊसजवळ अफगाण व्यक्तीने केलेल्या गोळीबारामध्ये, एका नॅशनल सिक्युरिटी गार्डचा मृत्यु झाला होता. त्यानंतर ट्रम्प यांनी अनेक देशांवर व्हिसा बंदी लागू केली होती.(US Imposes Visa Ban)
ट्रम्प यांचा गरीब राष्ट्रांप्रति भेदभावपूर्ण दृष्टीकोन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे जगातील अनेक गरीब देशांविषयी भेदभावाची भावना मनात बाळगत असल्याचे समोर आले आहे. ट्रम्प यांनी अनेकदा जाहीर विधान केले होते की, (US Imposes Visa Ban) त्यांना गैरयुरोपीय देशांमधून होणारे स्थलांतर कमी करायचे आहे. ट्रम्प यांनी यांनी सोमालियातील लोकांवरही टीका केली होती. तसेच नॉर्वे, स्वीडन आणि डेन्मार्कमधील नागरिकांना अमेरिकेत येण्यासाठी अधिक योग्य मानले होते.(US Imposes Visa Ban)