Municipal Corporations Elections : जिल्ह्यातील महापालिका मतदान पन्नास टक्के पार

16 Jan 2026 13:01:51
Municipal Corporations Elections
 
ठाणे : (Municipal Corporations Elections) ठाणे जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई, मीरा- भाईंदर, उल्हासनगर, कल्याण -डोंबिवली, भिवंडी या महानगरपालिका (Municipal Corporations Elections) हद्दीमध्ये मतदार पन्नास टक्क्यांच्या वर मतदान झाले तर मीरा -भाईंदर महानगरपालिका हद्दीमध्ये ४८. ६४ टक्के मतदान झाले. यामुळे या महानगरपालिकेत मतदान कमी प्रमाणात झाले. परंतु मतदारांनी मतदानाला चांगला प्रतिसाद दिला.(Municipal Corporations Elections)
 
ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी (Municipal Corporations Elections) गुरूवारी 15 जानेवारी 2026 रोजी झालेल्या मतदानाच्या आकडेवारीनुसार एकूण ५५. ५९ टक्के मतदान झाले असल्याची माहिती आयुक्त, निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी दिली. ठाणे महानगरपालिकेच्या एकूण ३३ प्रभागांमध्ये एकूण २०१३ मतदान केंद्रावर गुरूवारी मतदान प्रक्रिया पार पडली. या 33 प्रभागांमध्ये ८ लाख ६३ हजार ८७९ पुरूष, ७ लाख ८५ हजार ८३१ महिला आणि १५९ इतर असे एकूण १६ लाख ४९ हजार ८६९ मतदार होते. त्यापैकी ४८३६९८ पुरूष , ४३३३८५ स्त्री आणि ४० इतर असे एकूण ९१७१२३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.(Municipal Corporations Elections)
 
प्रभागनिहाय मतदानाची आकडेवारी मध्ये माजिवडा प्रभागसमिती - ५४. ७५ टक्के, वर्तकनगर प्रभाग समिती - ५४. ८६ टक्के, लोकमान्य सावरकरनगर - ५८.०९ टक्के, वागळे प्रभाग समिती - ५५. ५३ टक्के, नौपाडा कोपरी - ५९. ७९ टक्के, उथळसर - ६०.६० टक्के, कळवा प्रभाग समिती-५४.२९ टक्के, मुंब्रा प्रभाग समिती -४७.५९ टक्के, मुंब्रा प्रभाग समिती- ४९.१५ टक्के, दिवा प्रभाग समिती - ५७.३७ टक्के इतके मतदान झाले. नवी मुंबई महानगरपालिका (Municipal Corporations Elections) हद्दीत एकूण ५७.१५ टक्के मतदान झाले, यामध्ये प्रभागनुसार बेलापूर - ५३.८९ टक्के, नेरूळ -५६.८९ टक्के, वाशी - ५३. ९७ टक्के , तुर्भे - ६१.३० टक्के, कोपरखैरणे - ५५. ११ टक्के, घणसोली -५९.२० टक्के, ऐरोली -५६.७० टक्के, दिघा -६०.४१ टक्के मतदान झाले, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकसाठी (Municipal Corporations Elections) झालेल्या मतदानाच्या आकडेवारीनुसार एकूण ५२.११ टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक विभागाचे उपआयुक्त समीर भुमकर यांनी दिली. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या एकूण 30 प्रभागांमध्ये (प्रभाग क्र.24 बिनविरोध असल्यामुळे) एकूण १,५४८ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. या ३० प्रभागांमध्ये ७,२०,६७५ पुरूष, ६,५४८७२ महिला आणि ५५२ इतर असे एकूण १३,७६,०९९ मतदार होते. त्यापैकी ३,८३,५२४ पुरूष ३,३३,४८० स्त्री आणि १०३ इतर असे एकूण ७,१७,१०७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.(Municipal Corporations Elections)
 
हेही वाचा : Mumbai BMC Election Results 2026 Live : मॅजिक फिगर ओलांडली! मुंबईत भाजप - महायुतीची विजयी घोडदौड सुरुच
 
भिवंडी महानगरपालिकेमध्ये एकूण ५३. ४३ टक्के मतदान झाले, उल्हासनगर महानगरपालिकेत एकूण ५२. १० टक्के मतदान झाले, मीरा -भाईंदर महानगरपालिकेत एकूण ४८. ६४ टक्के मतदान झाले आहे.(Municipal Corporations Elections)
 
जिल्ह्यातील महापालिका मतदान आकडेवारी :
 
ठाणे : ५५.५९ टक्के
नवी मुंबई : ५७.१५ टक्के
मीरा भाईंदर : ४८.६४ टक्के
उल्हासनगर : ५२.१०. टक्के
कल्याण डोंबिवली : ५२.११ टक्के
भिवंडी : ५३.४३ टक्के
 
 
Powered By Sangraha 9.0