Mangalprabhat Lodha : विकासाच्या वेगवान डबल इंजिनला आता तिसऱ्या इंजिनची साथ : मंगलप्रभात लोढा

16 Jan 2026 19:56:06
Mangalprabhat Lodha
 
मुंबई : (Mangalprabhat Lodha) राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी दक्षिण मुंबईतला आपला मलबार हिलचा गड राखला आहे. त्यांच्या मलबार हिल विधानसभेत येणाऱ्या पाचच्या पाच वॉर्डमध्ये कमळ फुलवण्यात मंत्री लोढा  (Mangalprabhat Lodha) यशस्वी झाले असून कार्यकर्त्यांनी मतदार संघातल्या विविध भागात जल्लोष केला. (Mangalprabhat Lodha)
 
आतापर्यंत जनतेच्या केलेल्या सेवेचीच ही पावती असल्याची प्रतिक्रिया मंत्री लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी दिली आहे. मलबार हिल विधानसभेच्या वॉर्ड क्र. २१४ मधून भाजपचे अजय पाटील यांनी मनसेच्या मुकेश भालेराव यांचा तब्बल ८३७१ मतांनी पराभव केला. तर वॉर्ड क्रमांक २१५ मधून भाजपाचे संतोष ढाले यांनी उबाठाचे किरण बाळसराफ यांचा २८११ मतांनी पराभव केला. ताडदेव परिसरातील वॉर्ड क्रमांक २१७ मधून भाजपाचे उमेदवार गौरांग झवेरी यांनी मनसेचे उमेदवार निलेश शिरधनकर यांच्यावर ८८५७ मतांनी दणदणीत विजय मिळवला. गिरगाव परिसरातील वॉर्ड क्रमांक २१८ मधील भाजपच्या उमेदवार स्नेहल तेंडुलकर यांनी उबाठाच्या गीता अहिरेकर यांचा ७८४९ मतांनी पराभव केला. तर महालक्ष्मी परिसरातील वॉर्ड क्रमांक २१९ चे भाजप उमेदवार सन्नी सानप यांनी उबाठाचे राजेंद्र गायकवाड यांना ७५०० पेक्षा जास्त मतांनी धूळ चारली. (Mangalprabhat Lodha)
 
हेही वाचा : Nitesh Rane : उद्धव ठाकरे यांना माझा हसतानाचा चेहरा पाठवा : नितेश राणे
 
विजयाचा आनंद व्यक्त करताना मंत्री लोढा (Mangalprabhat Lodha) म्हणाले की," मुंबई मध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रात भाजपाच्या आणि महायुतीच्या विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात धावणाऱ्या विकासाच्या वेगवान डबल इंजिनला आता तिसऱ्या इंजिनची साथ मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजन प्रमाणे आता मुंबईच्या विकासाला अधिक गती मिळणार आहे. महायुतीच्या सर्व विजयी उमेदवारांच्या माध्यमातून नागरिकांच्या सेवेसाठी तत्परतेने कार्य केले जाईल. विरोधकांनी कितीही फेक नॅरेटिव्ह पसरवायचा प्रयत्न केला असला तरी, जनतेने विकासालाच कौल दिला आहे." (Mangalprabhat Lodha)
 
 
Powered By Sangraha 9.0