Al-Falah University : दिल्ली बॉम्बस्फोटांशी संबंधित अल-फलाह विद्यापीठावर ईडीची कारवाई

16 Jan 2026 20:09:39
Al-Falah University
 
मुंबई : (Al-Falah University) दिल्लीच्या लाल किल्ल्याबाहेर झालेल्या स्फोटाशी संबंधित फरिदाबादच्या अल-फलाह विद्यापीठावर (Al-Falah University) अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कडक कारवाई केली. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) ने एका मोठ्या कारवाईत ईडीने अल-फलाह विद्यापीठाची सुमारे १४० कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. अल-फलाह (Al-Falah University) ग्रुपचे अध्यक्ष जवाद अहमद सिद्दीकी आणि त्यांच्याशी संबंधित एका ट्रस्टविरुद्धही आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.(Al-Falah University)
 
हाती आलेल्या माहितीनुसार, ईडीने जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये फरिदाबादच्या धौज परिसरातील अंदाजे ५४ एकर जमीन, विद्यापीठाची मुख्य इमारत, विविध शैक्षणिक विभाग आणि शाळांच्या इमारती तसेच एक वसतिगृह संकुल यांचा समावेश आहे. या सर्व मालमत्ता अल-फलाह (Al-Falah University) ट्रस्टच्या नावावर नोंदणीकृत आहेत, ज्या एजन्सीने गुन्ह्यातून मिळालेल्या रकमा म्हणून जप्त केल्या आहेत.(Al-Falah University)
 
हेही वाचा : Narendra Modi: भाजपने मुंबईवर फडकवला भगवा! मोदींचं मराठीतून ट्विट, म्हणाले, “एनडीएच्या प्रत्येक…” 
 
अल-फलाह विद्यापीठ (Al-Falah University) यापूर्वीही तपास यंत्रणांच्या रडारवर आहे. १० नोव्हेंबर २०२५ रोजी विद्यापीठाशी संबंधित डॉक्टर डॉ. उमर उन नबी याने दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ चालत्या कारमध्ये स्वतःला उडवून दिले, ज्यामध्ये १२ लोकांचा मृत्यू झाला. व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित प्रकरणाच्या तपासादरम्यान त्याचे नाव समोर आले. या प्रकरणात, एनआयए आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी डॉ. मुझम्मिल आणि डॉ. शाहीन सईद यांच्यासह १० हून अधिक आरोपींना अटक केली.(Al-Falah University)
 
अल-फलाह विद्यापीठ हे कथित दहशतवादी नेटवर्कचे संभाव्य केंद्र असल्याचे लक्षात घेऊन तपास यंत्रणांनी त्याचा सखोल तपास सुरू केला. सध्या, ईडी, एनआयए आणि इतर सुरक्षा संस्था या प्रकरणाचा तपास करत आहेत यापुढे देखील आणखी कारवाई केली जाणार आहे.
 
  
Powered By Sangraha 9.0