मुंबई : (Al-Madinah) समुद्रमार्गे भारतात घुसखोरी करणाऱ्या ९ पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या बोटीसह ताब्यात घेण्यात आले आहे. बुधवारी रात्री भारतीय तटरक्षक दलाने एका सतर्क मोहिमेत सागरी घुसखोरीचा हा प्रयत्न उधळून लावला. अरबी समुद्रात नियमित गस्तीदरम्यान तटरक्षक दलाला आंतरराष्ट्रीय सागरी सीमा रेषेजवळ 'अल मदिना' (Al-Madinah)ही पाकिस्तानी मासेमारी नौका भारतीय हद्दीत प्रवेश करताना आढळली.(Al-Madinah)
मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा तटरक्षक दलाच्या जहाजाने बोटीला आव्हान दिले तेव्हा घुसखोरांनी पाकिस्तानच्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्या हेतूंबद्दल आणखी शंका निर्माण झाली. तटरक्षक दलाच्या जहाजाने बोटीचा पाठलाग केला. अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करणारे पाकिस्तानी घुसखोर घाबरले, परंतु त्यांना भारतीय हद्दीत अडवून पकडण्यात आले.(Al-Madinah)
हेही वाचा : Al-Falah University : दिल्ली बॉम्बस्फोटांशी संबंधित अल-फलाह विद्यापीठावर ईडीची कारवाई
तटरक्षक दलाचे जवानांनी घुसखोरांच्या बोटीवर चढत कारवाई केली. जप्त केलेल्या बोटीची ओळख 'अल-मदिना' (Al-Madinah) अशी झाली आहे. ज्यामध्ये एकूण नऊ पाकिस्तानी नागरिक होते. या सर्वांना ताब्यात घेण्यात आले असून बोटीसह (Al-Madinah) त्यांना गुजरातमधील पोरबंदर येथे आणण्यात आले. सुरक्षा आणि गुप्तचर संस्था बोटीची कसून तपासणी करत असून पाकिस्तानी नागरिकांची देखील चौकशी केली जात आहे.(Al-Madinah)