मुंबई : (Narendra Modi) मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ मध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने बहुमत मिळवत मुंबईवर भगवा फडकावला आहे. अनेक वर्षांनंतर मुंबई महापालिकेवर भाजपचे वर्चस्व प्रस्थापित झाल्याने राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. या दणदणीत विजयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून ट्विट करत महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले असून, एनडीएच्या सुशासन आणि विकासाच्या अजेंड्याला मिळालेला हा कौल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. (Narendra Modi)
पंतप्रधान मोदी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, “महाराष्ट्राचे आभार! राज्यातील उत्साही जनतेने एनडीएच्या जनहितकारी आणि सुशासनाच्या अजेंड्याला आपले आशीर्वाद दिले आहेत. विविध महानगरपालिका निवडणुकांचे निकाल हे दर्शवितात की महाराष्ट्रातील जनतेशी एनडीएचे नाते अधिक दृढ झाले आहे.” (Narendra Modi)
तसेच, “आमच्या कामगिरीचा अनुभव आणि विकासाची दृष्टी जनतेच्या मनाला भावली आहे. महाराष्ट्रातील सर्व जनतेप्रती मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. हा कौल प्रगतीला अधिक गती देणारा असून, राज्याशी जोडलेल्या गौरवशाली संस्कृतीचा उत्सव साजरा करणारा आहे,” असेही त्यांनी नमूद केले. (Narendra Modi)
मुंबई महानगरपालिकेत भाजप–महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवले असून भायखळा प्रभाग क्रमांक २०७, सायन-माटुंगा १७२, अंधेरी पूर्व प्रभाग ६० यांसारख्या अनेक महत्त्वाच्या प्रभागांत भाजपने विजय मिळवला आहे. काही ठिकाणी स्थानिक बालेकिल्ले उद्ध्वस्त झाले असून ठाकरे गट, काँग्रेस आणि मनसेला मोठे धक्के बसले आहेत. विशेषतः ठाकरे गटासाठी ही निवडणूक अत्यंत आव्हानात्मक ठरली. (Narendra Modi)
राज्यातील इतर महानगरपालिकांमध्येही भाजपची कामगिरी लक्षवेधी ठरली आहे. इचलकरंजी महानगरपालिकेत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता काबीज केली, तर मुंबईत भाजपची घोडदोड सुरू राहिली. वसई-विरारमध्ये बविआ आणि कल्याण-डोंबिवलीत मनसेला काही प्रमाणात यश मिळाले असले तरी एकूण चित्र भाजप–एनडीएच्या बाजूने झुकलेले दिसून आले. (Narendra Modi)