Mumbai BMC Election Results 2026 Live : ठाकरेंच्या उमेदवाराला धूळ चारली! प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर विजयी

16 Jan 2026 13:33:32

BMC

मुंबई : (Mumbai BMC Election Results 2026)
मुंबईच्या कांदिवलीच्या प्रभाग क्रमांक ३ मधून भाजपचे प्रकाश दरेकर हे विजयी झाले आहेत. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांचे ते बंधू आहेत. त्यांनी उबाठा उमेदवार रोशनी गायकवाड यांचा पराभव करुन त्यांनी विजय मिळवला आहे. प्रकाश दरेकर हे मुंबई हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष आहेत. (Mumbai BMC Election Results 2026)

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू असून निवडणुकीचे कल समोर येत आहेत. प्रकाश दरेकर यांचा विजय झाला असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यभरात जवळपास महापालिकांवर भाजपची दमदार कामगिरी बघायला मिळत आहे. (Mumbai BMC Election Results 2026)


Powered By Sangraha 9.0