Mumbai BMC Election Results 2026 Live : भाजपला धक्का! वॉर्ड क्रमांक १८५मधून रवी राजा पराभूत, उबाठाने मारलं मैदान!

16 Jan 2026 15:07:07
Mumbai BMC Election Results 2026 Live
 
मुंबई : (Mumbai BMC Election Results 2026 Live) मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ मध्ये धारावी परिसरातील वॉर्ड क्रमांक १८५ मध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे उमेदवार आणि माजी काँग्रेस नेते रवी राजा यांचा पराभव झाला असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उमेदवार जगदीश शिवालप्पी यांनी या चुरशीच्या प्रभागात विजय मिळवला आहे. या निकालामुळे ठाकरे गटाने धारावीतील महत्त्वाची जागा कायम राखल्याचे स्पष्ट झाले आहे. (Mumbai BMC Election Results 2026 Live)
 
हेही वाचा : Mumbai BMC Election Results 2026 Live : वॉर्ड क्रमांक ५४मध्ये आमदार सुनील प्रभूंचे पुत्र अंकित प्रभू विजयी!
 
रवी राजा हे काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले असून, धारावी परिसरात त्यांचा वैयक्तिक जनसंपर्क आणि स्थानिक प्रभाव असल्याचे मानले जात होते. मात्र, प्रत्यक्ष निकालात त्यांचा पराभव झाला आहे. विशेष म्हणजे, संपूर्ण मुंबईत भाजप आघाडीवर असतानाही (२२७ पैकी २२१ जागांवर कल स्पष्ट), धारावीसारख्या संवेदनशील आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या प्रभागात भाजपचा पराभव हा पक्षासाठी धक्कादायक मानला जात आहे. (Mumbai BMC Election Results 2026 Live)
 
 
Powered By Sangraha 9.0