मुंबई : (Mumbai BMC Election Results 2026 Live) बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ मध्ये सायन–माटुंगा परिसरातील प्रभाग क्रमांक १७२ (F/N वॉर्ड) मध्ये भाजपच्या राजश्री शिरवाडकर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. हा प्रभाग सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित असून, या निकालामुळे उबाठाच्या (‘मशाल’) आशांना मोठा धक्का बसला आहे. (Mumbai BMC Election Results 2026 Live)
हेही वाचा : Mumbai BMC Election Results 2026 Live : कांदिवलीच्या वॉर्ड क्रमांक ९ मधून भाजपचे शिवानंद शेट्टी विजयी!
मतमोजणीदरम्यान सुरुवातीपासूनच आघाडी घेत राजश्री शिरवाडकर यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले. या प्रभागात उबाठा, काँग्रेस आणि मनसे या तिन्ही पक्षांना पराभव स्वीकारावा लागला. सुमारे ५१,५३५ लोकसंख्या असलेल्या या प्रभागात लोकमान्य टिळक रुग्णालय, सायन फोर्ट, गांधी मार्केट तसेच माटुंगाचा महत्त्वाचा भाग समाविष्ट आहे. महायुतीच्या प्रचार रॅलींना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचे चित्र प्रचारकाळात दिसून आले होते. (Mumbai BMC Election Results 2026 Live)
विशेष म्हणजे, राजश्री शिरवाडकर यांनी २०१७ च्या निवडणुकीतही याच प्रभागातून विजय मिळवला होता. तेव्हा त्यांना १३,७३१ मते मिळाली होती, तर शिवसेना, काँग्रेस आणि मनसेचे उमेदवार पिछाडीवर राहिले होते. यंदाही महायुतीच्या एकजुटीचा फायदा भाजपला झाला असून, हा प्रभाग पुन्हा एकदा भाजपने आपल्या ताब्यात ठेवला आहे. (Mumbai BMC Election Results 2026 Live)