Mumbai BMC Election Results 2026 Live : काँग्रेसचे ज्ञानराव निकम विजयी, भेंडी बाजार–मझगावमध्ये काँग्रेसची पकड कायम

16 Jan 2026 16:24:46
 
Mumbai BMC Election Results 2026 Live
 
मुंबई : (Mumbai BMC Election Results 2026 Live) मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ मध्ये प्रभाग क्रमांक २२३ (बी वॉर्ड, भेंडी बाजार–मझगाव परिसर) मधून काँग्रेसचे उमेदवार ज्ञानराज यशवंत निकम उर्फ ज्ञानराव निकम यांनी विजय मिळवला आहे. हा प्रभाग इतर मागासवर्गीयांसाठी (OBC) राखीव असून, चुरशीच्या लढतीत ज्ञानराव निकम यांनी मनसे, शिवसेना आणि समाजवादी पक्षाच्या उमेदवारांचा पराभव केला. (Mumbai BMC Election Results 2026 Live)
 
हेही वाचा :  Mumbai BMC Election Results 2026 Live : युवराजांच्या वरळीत शिंदेंनी भेदला गड! आदित्य ठाकरेंना मोठा धक्का; प्रभाग क्र. १९७ मध्ये वनिता नरवणकर विजयी
 
या प्रभागात काँग्रेसचे ज्ञानराव निकम विजयी झाले, तर मनसेचे प्रशांत गांधी, शिवसेनेच्या प्रिया पाटील आणि समाजवादी पक्षाच्या आफरीन शेख यांना पराभव स्वीकारावा लागला. बहुपक्षीय लढतीत काँग्रेसने आघाडी घेत मतदारांचा विश्वास कायम ठेवला. (Mumbai BMC Election Results 2026 Live)
 
प्रभाग क्रमांक २२३ ची लोकसंख्या सुमारे ६३,०४५ असून, येथे अनुसूचित जाती, मुस्लिम आणि मराठी मतदारांचा मोठा वाटा आहे. सामाजिकदृष्ट्या विविध घटक असलेल्या या भागात काँग्रेसची पारंपरिक पकड यंदाही कायम राहिल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे. भेंडी बाजार आणि मझगाव परिसरात स्थानिक प्रश्न, नागरी सुविधा आणि सामाजिक समतोल या मुद्द्यांवर मतदारांनी काँग्रेसला पसंती दिल्याचे चित्र आहे. (Mumbai BMC Election Results 2026 Live)
 
 
Powered By Sangraha 9.0