मुंबई : (Mumbai BMC Election Results 2026 Live) बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ मध्ये मुलुंडच्या टी वॉर्डमधील वॉर्ड क्रमांक १०३ मध्ये भाजपने महत्त्वपूर्ण विजय नोंदवला आहे. भाजपच्या डॉ. हेतल गाला-मोरवेकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीप्ती राजेश पांचाळ यांचा पराभव करत बाजी मारली. हा निकाल मनसेसाठी मोठा धक्का मानला जात असून, राजकीय वर्तुळात या विजयाकडे “मनसेच्या इंजिनाला भाजपची धडक” अशा रूपात पाहिले जात आहे. (Mumbai BMC Election Results 2026 Live)
हेही वाचा : Mumbai BMC Election Results 2026 Live : डॅडींचा बालेकिल्ला भाजपने भेदला! योगिता अरुण गवळींचा पराभव
या प्रभागात डॉ. हेतल गाला-मोरवेकर यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती. महायुतीच्या उमेदवार म्हणून त्यांनी संघटित आणि आक्रमक प्रचार केला. सोसायटी-भेटी, स्थानिक प्रश्नांवर संवाद आणि विकासाचा मुद्दा यावर भर देत त्यांनी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्याचा थेट फायदा निकालात दिसून आला. (Mumbai BMC Election Results 2026 Live)
मनसेसाठी हा वॉर्ड प्रतिष्ठेचा मानला जात होता. मात्र, निवडणुकीआधीच पक्षाला संघटनात्मक अडचणींचा सामना करावा लागला. अंधेरी पूर्वेसह मुंबईतील काही भागांत मनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने पक्षाची ताकद कमी झाल्याचे चित्र होते. त्याचा परिणाम थेट निवडणुकीत उमटल्याची चर्चा आहे. या लढतीत काँग्रेसकडून मनीषा संतोष सोनावणे, तर अपक्ष म्हणून पल्लवी केशव जोशी रिंगणात होत्या. मात्र, मुख्य लढत भाजप आणि मनसेमध्येच पाहायला मिळाली. (Mumbai BMC Election Results 2026 Live)