
या प्रभागात भाजप विरुद्ध शिवसेना (उबाठा) अशी थेट लढत पाहायला मिळाली. मतमोजणीदरम्यान सुरुवातीपासूनच दक्षता कवठणकर यांनी आघाडी घेतली आणि अखेर विजय निश्चित केला. “मशाल” चिन्हाला “कमळा”कडून जोरदार टक्कर देत भाजपने दक्षिण मुंबईत आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. (Mumbai BMC Election Results 2026 Live) दक्षता कवठणकर या भाजपचे स्थानिक नेते श्रीकांत कवठणकर यांच्या पत्नी असून, त्या गेल्या काही काळापासून प्रभागात सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या सक्रिय आहेत. प्रचारादरम्यान स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि महायुतीची स्थिरता हे मुद्दे मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यात भाजपला यश आले. (Mumbai BMC Election Results 2026 Live)