मुंबई : (Mumbai BMC Election Results 2026 Live) मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ मध्ये भायखळा परिसरातील वॉर्ड क्रमांक २०७ (ई वॉर्ड) मध्ये भाजपने मोठा राजकीय धक्का देत विजय मिळवला आहे. अरुण गवळींचा पारंपरिक बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या प्रभागात भाजपचे उमेदवार रोहिदास लोखंडे विजयी झाले असून, त्यांनी अखिल भारतीय सेनेच्या योगिता अरुण गवळी यांचा पराभव केला.
(Mumbai BMC Election Results 2026 Live)
निकालानुसार रोहिदास लोखंडे यांना ६,००५ मते मिळाली, तर योगिता गवळी पराभूत झाल्या. भायखळा परिसरात गवळी कुटुंबाची दीर्घकाळापासून राजकीय पकड असतानाही, यंदा मतदारांनी भाजपला कौल दिल्याने राजकीय समीकरणे बदलल्याचे चित्र आहे. (Mumbai BMC Election Results 2026 Live)
रोहिदास लोखंडे हे भायखळा विधानसभा क्षेत्रात भाजपचे प्रमुख नेते म्हणून ओळखले जातात. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी निवडणूक प्रमुख म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे. स्थानिक पातळीवर संघटन मजबूत करत त्यांनी मतदारांशी थेट संपर्क साधला, याचा फायदा भाजपला या निवडणुकीत झाला. (Mumbai BMC Election Results 2026 Live)