मुंबई : (Mumbai BMC Election Results 2026 Live) मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ मध्ये वरळीतील राजकारणात मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. शिवसेना शिंदे गटाने थेट युवराज आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात घुसखोरी करत मोठा विजय मिळवला आहे. वरळीतील प्रभाग क्रमांक १९७ मध्ये शिंदे गटाच्या वनिता नरवणकर यांनी ठाकरे गटाच्या उमेदवाराचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला. या निकालामुळे ठाकरे गटाला, विशेषतः आदित्य ठाकरेंना, मोठा धक्का बसला आहे. (Mumbai BMC Election Results 2026 Live)
वरळी हा आदित्य ठाकरे यांचा पारंपरिक प्रभावाचा भाग मानला जातो. त्यामुळे या प्रभागातील पराभव केवळ एका जागेपुरता मर्यादित न राहता ठाकरे गटाच्या राजकीय पकडीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरला आहे. महायुतीतील अंतर्गत स्पर्धा असूनही शिंदे गटाने येथे आपली ताकद सिद्ध केली आहे. (Mumbai BMC Election Results 2026 Live)
हेही वाचा : Ichalkaranji Municipal Corporation: इचलकरंजी महानगरपालिकेत भाजपचा ऐतिहासिक विजय; पहिल्याच कलात बहुमताचा टप्पा पार
विशेष म्हणजे, वरळीतील इतर प्रभागांमध्येही शिंदे गटाने दमदार कामगिरी केली आहे. प्रभाग क्रमांक १९३ आणि १९४ मध्येही शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले असून, प्रल्हाद वरळीकर यांच्यासह इतर उमेदवारांनी ठाकरे गटाला मागे टाकले आहे. यामुळे संपूर्ण वरळी परिसरात शिंदे गटाचे वर्चस्व वाढल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. (Mumbai BMC Election Results 2026 Live)
या निकालांमुळे मुंबईतील ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्यांना तडे जात असल्याचे संकेत मिळत आहेत. दुसरीकडे, शिंदे गटासाठी हा विजय केवळ संख्यात्मक नसून राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. आगामी काळात वरळी आणि दक्षिण मुंबईतील राजकारणाची दिशा या निकालांमुळे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Mumbai BMC Election Results 2026 Live)