Mumbai BMC Election Results 2026 Live : वॉर्ड ४७ मध्ये भाजपचा भगवा; तेजिंदर तिवाना विजयी

16 Jan 2026 21:29:49

मुंबई : (Mumbai BMC Election Results 2026 Live) मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ मध्ये वॉर्ड क्रमांक ४७ मधून भारतीय जनता पक्षाचे युवा नेते तेजिंदर सिंग तिवाना यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. बहुपक्षीय लढतीत तेजिंदर तिवाना यांनी शिवसेना (उबाठा), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बसपा तसेच अपक्ष उमेदवारांचा पराभव करत हा प्रभाग भाजपच्या ताब्यात आणला. (Mumbai BMC Election Results 2026 Live)

या वॉर्डमध्ये मुख्य लढत भाजप आणि शिवसेना (उबाठा) यांच्यात अपेक्षित असली तरी मतदारांनी स्पष्टपणे भाजपला कौल दिला. काँग्रेसकडून परमिंदरसिंग भामरा, शिवसेना (उबाठा) कडून गणेश शंकर गुरव, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून चेट्टी भक्तिनाथन अरोक्कियास्वामी यांनी निवडणूक लढवली होती. मात्र प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात तेजिंदर तिवानांना मिळालेला वाढता जनसमर्थनाचा ओघ निकालात निर्णायक ठरला. (Mumbai BMC Election Results 2026 Live)

तेजिंदर तिवाना हे भाजप युवा मोर्चाचे सक्रिय कार्यकर्ते असून, ते माजी नगरसेवकांच्या कुटुंबातून आलेले आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी राजनपाडा परिसरातील दीर्घकालीन पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय, स्थानिक मैदाने व उद्याने विकसित करणे, सोलर लाईट्स बसवणे, ड्रग्सविरोधी जनजागृती मोहीम आणि बेकायदेशीर बांगलादेशी व रोहिंग्या अतिक्रमणांविरोधात कठोर भूमिका घेण्याचे आश्वासन दिले होते. या मुद्द्यांना स्थानिक मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. (Mumbai BMC Election Results 2026 Live)



Powered By Sangraha 9.0