Mumbai BMC Election Results 2026 Live : भाजपच्या तेजस्वी घोसाळकर यांचा विजय; ‘विकासासाठीच मत मिळाले’

16 Jan 2026 17:45:29
 
Mumbai BMC Election Results 2026 Live
 
मुंबई : (Mumbai BMC Election Results 2026 Live) मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या तेजस्वी घोसाळकर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. भाजपच्या पहिल्या विजयी उमेदवारांपैकी एक ठरलेल्या तेजस्वी घोसाळकर यांनी निकालानंतर आपली पहिली प्रतिक्रिया देत आनंद व्यक्त केला. (Mumbai BMC Election Results 2026 Live)
 
हेही वाचा :  Mumbai BMC Election Result 2026 : मुंबईत तख्तापालट! ठाकरेंना धक्का, भाजप-शिवसेना युतीची आघाडी; वाचा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी!
 
विजयानंतर बोलताना घोसाळकर म्हणाल्या की, “हे यश माझं वैयक्तिक नसून भाजपच्या संपूर्ण टीमचं आहे. आमदार मनीषा ताई, खासदार पियुष गोयलजी, माजी नगरसेवक जगदीशभाई तसेच सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी रात्रंदिवस मेहनत घेतली. त्यांच्या अथक परिश्रमामुळेच हा विजय शक्य झाला.” सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानले. (Mumbai BMC Election Results 2026 Live)
 
तेजस्वी घोसाळकर यांनी मतदारांचा विश्वास विकासकामांवर असल्याचे अधोरेखित केले. “आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो की आम्ही विकासासाठी काम करत आहोत आणि विकासासाठीच आम्हाला मत मिळाले आहे,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. जनतेने दिलेला कौल हा भाजपच्या विकासात्मक धोरणांवर शिक्कामोर्तब करणारा असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Mumbai BMC Election Results 2026 Live)
 
 
Powered By Sangraha 9.0