मुंबई : (Mumbai BMC Election Results 2026 Live) मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ मध्ये अंधेरी पूर्वेतील के वॉर्डमधील प्रभाग क्रमांक ६० मधून भारतीय जनता पक्षाच्या सायली कुलकर्णी यांनी चुरशीच्या लढतीत दणदणीत विजय मिळवला आहे. सुमारे ६,००० हून अधिक मतांच्या फरकाने त्यांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत महायुतीसाठी हा प्रभाग कायम राखला. या विजयामुळे अंधेरी-पूर्व भागात भाजपची राजकीय पकड अधिक मजबूत झाल्याचे चित्र आहे. (Mumbai BMC Election Results 2026 Live)
हेही वाचा : Mumbai BMC Election Results 2026 Live : भाजपच्या तेजस्वी घोसाळकर यांचा विजय; ‘विकासासाठीच मत मिळाले’
प्रभाग क्रमांक ६० हा वर्सोवा-अंधेरी परिसराला लागून असलेला, सोसायटी बहुल आणि मराठी मतदारांची मोठी संख्या असलेला प्रभाग म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या प्रभागात विकासकामांसोबतच मराठी अस्मिता हा मुद्दाही निर्णायक ठरतो. (Mumbai BMC Election Results 2026 Live)
या विजयासह भाजपच्या मुंबईतील एकूण ११८ जागांपैकी ही एक महत्त्वाची जागा ठरली आहे. अंधेरी पूर्वेसारख्या महत्त्वाच्या शहरी भागात मिळालेला हा विजय महायुतीसाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात असून, आगामी महापालिकेतील सत्तास्थापनेच्या दृष्टीनेही तो निर्णायक ठरू शकतो. (Mumbai BMC Election Results 2026 Live)